मावळ, पुणे : सध्या सगळीकडेच लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) चर्चा सुरु आहे. सर्व पक्ष आपापल्या परिने आपल्या पक्षाचं काम करताना दिसत आहे. त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे उद्या मावळ लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असणार आहं. त्यांनी मावळ मतदार संघात जनसंवाद दौरा आयोजित केला आहे. पक्ष फुटला. त्यानंतर पक्ष आणि पक्ष चिन्ह शिंदे गटाला गेलं. त्यानंतर येणारी ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे अनेक ठिकाणी दौरा करताना दिसत आहे. 


उद्धव ठाकरे मावळ लोकसभा मतदारसंघात  पनवेल, खोपोली,उरण या तीन ठिकाणी उद्या सभा घेणार  आहे. दुपारी तीन वाजता  हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचे उद्घाटन उद्धव ठाकरे करणार आहेत. दुपारी चार वाजता पनवेल येथे जनसंवाद सभा घेणार आहेत. साडेपाच वाजता खोपोली तिथे सतीश झाकोटिया मैदान इथे सभा घेतली जाणार आहे.संध्याकाळी साडेसात वाजता नवीन सेवा मैदान, उरण या ठिकाणी सभा होणार आहे. 


मावळ लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे खासदार श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट पूर्णपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून आलेले माजी महापौर संजोग वाघेरे त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून या लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. यामुळे आता राज्यात अनेक ठिकाणी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे सभा घेण्याची शक्यता आहे. 


श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे लढत होणार?


मावळ लोकसभेतील या राजकीय घडामोडी पाहता श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे (Sanjyog Waghere) अशीच लढत होईल, असं सध्याचं चित्र आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना झालाचं तर कोणाचं पारडं जड असेल हे पाहणं महत्वाचं राहील. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा हा मावळ लोकसभा मतदारसंघ आहे. पिंपरी, चिंचवड आणि मावळ हे पुण्यातले तर कर्जत, उरण आणि पनवेल हे रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा यात समावेश आहे. यात चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर, उरणमध्ये अपक्ष निवडून आलेले मात्र भाजप संलग्न असणारे महेश बालदी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरीत अण्णा बनसोडे, मावळमध्ये सुनील शेळके आणि कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे विधानसभेचे नेतृत्व करतात. भाजपचे तीन, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि शिंदेंच्या शिवसेनेचा एक असं आमदारांचं पक्षीय बलाबल आहे.


इतर महत्वाची बातमी-


Pune Crime News : Hello, मी पोलीस बोलतोय?; इंस्टाग्रामवर पोलीस असल्याचं सांगितलं अन् तरुणीशी...