पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाली आहे. ही गुन्हेगारी   (PUNE CRIME) रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे. सोशल मीडियाच्या मार्फत हे गुन्हे वाढत असल्याचं समोर आलं असतानाच आता  पोलिस उपनिरीक्षक (PI) असल्याचे सांगून तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. इंस्टाग्रामवरुन (Instagram) दोघांची ओखळ झाली होती. मैत्रीत भुरट्याने थेट पोलीस असल्याचं सांगितलं आणि हे कृत्य केलं आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवरून पोलिस उपनिरीक्षक (PI) असल्याचे सांगून तरुणीशी ओळख वाढविली. त्यानंतर चॅटिंग व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तरुणीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.  तिच्याकडून पैसे घेऊन लग्नाची तशीच शारीरिक सुखाची मागणी केली.  वाकड परिसरात हा सगळा प्रकार घडला आहे. 


एका 24 वर्षाच्या तरुणीची इंस्टाग्रामवरुन ओखळ झाली होती.  शुभम राठोड असं त्या मुलाचं नाव आहे.  शुभम याने ‘पीएसआय शुभम राठोड’ या नावाच्या इन्स्टाग्राम आयडीवरून दुसऱ्याच एका पीएसआयचा फोटो वापरून त्यावरून व्हाटसअप तसेच काॅल करून तरुणीशी संपर्क साधला. त्यानंतर तिच्याशी ओखळ वाढवली. त्यानंतर नंबर मागवून तिच्याशई whatsappवर बोलणं सुरु केलं. पीएसआय असल्याचे सांगून त्याने तरुणीशी ओळख वाढविली. तिच्याशी लग्न करायचे आहे, असे सांगून तिचे फोटो प्राप्त केले. ते फोटो व चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी दिली आणि पैशाची मागणी केली. आठ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करुन तिच्याकडे आठ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्याने अधिक पैशांचीदेखील मागणी केली.त्यामुळे शुभम याने वारंवार फोनवरून, व्हाटसअपवरून लग्नाची, शारीरिक सुखाची व पैशांची मागणी केली. ही बाब अति होत असल्याचं तरुणीच्या लक्षात आलं आणि तरुणीने थेट पोलिसांत धाव घेतली. 


सोशल मीडियाची मैत्री भोवते अन् गुन्हा घडतो

सोशल मीडियावरुन झालेली मैत्री अनेकांना महागात पडत असल्याचं चित्र आहे. नानाविध प्रकारचे आमिष दाखवून तरुणींना या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात. अनेक तरुणी अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडतात. सोशल मीडियामुळे होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येत सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना अनेक गोष्टींची काळजी घेण्याचं आवाहन सोशल मीडिया एक्सपर्ट वारंवार करतात.


सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी?


-सोशल मीडियासाठी Two Way Authentication चा वापर करा. 
-पर्सनल मोबाइल नंबर आणि पब्लिक मोबाइल नंबर वेगळा ठेवा.
-कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका. 
-टोपण नावाचा वापर करा. यूझर नेम म्हणून स्वतःचे खरे नाव वापरू नका.
-आपल्या ऑनलाइन प्रोफाइलमध्ये वैयक्तिक माहिती देऊ नका.
-प्रोफाइल सेट करताना सर्वात मजबूत प्रायव्हसी सेटिंग वापरा. यामुळे फक्त तुमचे मित्र तुमची माहिती पाहू शकतील.
-ऑनलाइन चॅटिंगचे नियम स्वतःच ठरवा. चॅट वापरण्याचा कालावधी स्वतःच ठरवून तो पाळण्याचा प्रयत्न करा.
-सार्वजनिक ठिकाणी असलेलं वायफाय/ इंटरनेट वापरू नका. 


इतर महत्वाची बातमी-


Baramati Sunetra Pawar : बारामतीत सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचे निश्चित?; कार्यकर्त्यांकडून भावी खासदार म्हणून थेट स्टेट्स!