Pooja Khedkar: वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला पुणे पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आलेली होती. पूजाला पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, पूजा खेडकरने पुणे पोलिसांनी नोटीस देऊनही पुण्यात हजर न राहता ती अद्याप वाशीममध्ये मुक्कामी असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला दुसरी नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. पहिली नोटीस दिल्यानंतर हजर न राहिल्याने दुसरी नोटीस देण्यात आली आहे.


पूजा खेडकरने आपला वाशिम येथील मुक्काम दोन दिवस वाढल्याची माहिती आहे. पूजा खेडकर जवळपास 66 तास उलटून वाशिमच्या विश्रामगृहावर गोदावरी खोलीत आपला मुक्काम ठोकून आहे. पूजा आपल्याला लागणाऱ्या गरजेच्या सर्व गोष्टी आपल्या खोलीमध्येच बोलून घेत असल्याची माहिती आहे. गेल्या 66 तासापासून पूजा खेडकर बंद खोलीत आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याबाबत केलेल्या तक्रारीचा जबाब पूजाने पुणे पोलीसाकडे नोंदवणे अपेक्षित होतं. मात्र पुण्यात हजर न राहता पूजा खेडकरने वाशिमला मुक्कामी राहणं पसंत केलं. पबजा खेडकरला पुण्यासह 20 तारखेपर्यंत मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात देखील हजर पाहावं लागणार आहे. 


पूजा खेडकरने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप केले होते. या आरोपासंदर्भात लेखी जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांकडून पूजा खेडकरला नोटीस बजावण्यात आलेली होती. तिला पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिलेले होते. मात्र पूजा खेडकर अद्याप वाशिममधील शासकीय विश्रामगृहात मुक्कामी आहे. 


पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला दिली दुसरी नोटीस


पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला दुसरी नोटीस दिली आहे. पुणे पोलिसांनी पहिल्या नोटीसमध्ये आपल्या तक्रारीसंबधीचा जबाब नोंदवावा यासाठी पूजाला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र पूजा गैरहजर राहिल्याने पुणे पोलिसांनी दुसरी नोटीस दिली आहे. वाशिम पोलिसांच्या एपीआय श्रीदेवी पाटील यांनी पूजा खेडकरची भेट घेऊन ही नोटीस दिली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर आरोप केल्यासंदर्भात पूजा खेडकरला उद्या पुणे येथे जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस दिल्याची माहिती समोर आली आहे. 


पुजा खेडकरनी जबाब नोंदवण्यासाठी 20 जुलैला उपस्थित राहावे यासाठी पुणे पोलीसांनी दुसऱ्यांदा नोटीस दिली आहे. पुणे पोलिसांनी तिला पहिल्यांदा जबाब नोंदवण्यासाठी बोलावल्यानंतर आपल्याला लगेच जबाब नोंदवण्यासाठी येणं शक्य नाही असं उत्तर पुजा खेडकरनी पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलीसांकडून दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे. उद्या पुजा खेडकर त्यासाठी पुण्यात येणार का हे पहावं लागेल.


पूजा खेडकरला या आधी नोटीस देऊन काल (18 जुलै) रोजी पुणे येथे उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. मात्र पूजा खेडकर उपस्थित न राहिल्यानं दुसरी नोटीस दिल्याची माहिती आहे. पूजा खेडकर सध्या वाशिम येथील विश्रामगृहावर मुक्कामी आहे. उद्या जबाब नोंदवण्यासाठी पुण्यात हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.