पुणे : बनावट शिक्क्यांच्या साहाय्याने स्टॅम्प विक्री करणाऱ्या कुटुंबाला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कसबा पेठेतून या कुटुंबाला अटक केली आहे. सुहास देशपांडे आपल्या कुटुंबासह बनावट शिक्के मारुन स्टॅम्प पेपर विकत होते, अशी प्राथमिक माहिती आहे.

देशपांडे व्हेंडर या नावाची कसबा पेठेतील लाल महालासमोर आणि शनिवार पेठेत देशपांडे कुटुंबीयांच्या मालकीची दोन दुकाने आहेत. या दुकानांमधून 100 आणि 500 रुपयांचे स्टॅम्प विकले जात होते. या स्टॅम्पवर वरिष्ठ कोषागार अधिकाऱ्याच्या नावाचा शिक्का मारला जात होता. देशपांडे यांना फक्त स्टॅम्प विकण्याचा अधिकार असताना ते सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाचा शिक्का मारुन स्टॅम्प विकत होते.

दरम्यान पोलिसांच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर देशपांडे कुटुंबाच्या दोन्ही दुकानांवर छापे घालण्यात आले. त्यावेळी 68 लाख 38 हजार रुपयांचे खोटे शिक्के मारलेले स्टॅम्प आढळून आले.