एक्स्प्लोर

लडाखमध्ये दरीत पडलेल्या पुण्याच्या पद्मेशवर चंदीगढमध्ये उपचार

अथक चढाईनंतर पद्मेश आणि त्याचे मित्र स्टोट क्रांगीच्या पायथ्याशी पोहोचले. मात्र हवामान खराब झाल्यामुळं मित्रांनी पुढे न जाण्याचं ठरवलं. पद्मेशला मात्र शिखर खुणावत होतं.

पुणे : ट्रेकिंग करताना लडाखमधल्या स्टोक कांग्री शिखराजवळ कोसळलेल्या पुण्याच्या पद्मेश पाटीलची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर सध्या चंदीगढमधल्या लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लडाखच्या कुशीत 20 हजार फूट उंचीवर वसलेला आणि भल्या भल्या ट्रेकर्सना आव्हान देणारं स्टोक कांग्री शिखर. पुण्याचा पद्मेश पाटील आणि त्याच्या दोन मित्रांनीही स्टोक क्रांगी सर करायचं आवाहन स्वीकारलं. 9 ऑगस्टला प्रवास सुरु झाला. अथक चढाईनंतर पद्मेश आणि त्याचे मित्र स्टोट क्रांगीच्या पायथ्याशी पोहोचले. मात्र हवामान खराब झाल्यामुळं मित्रांनी पुढे न जाण्याचं ठरवलं. पद्मेशला मात्र शिखर खुणावत होतं. मित्रांना मागे सोडून त्यानं एकट्यानंच ट्रेकिंग करायचं ठरवलं. त्यानं जवळपास 18 हजार फुटापर्यंत यशस्वी चढाई केली. 15 ऑगस्टचा दिवस होता. स्टोक कांग्री पद्मेश पाटीलपासून फक्त 2 हजार फूट दूर होतं. मात्र ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पद्मेशच्या फुफ्फुसात पाणी जमा झालं. तशा अवस्थेत तो 1 हजार फूट खोलवर कोसळला.

पुण्यातील तरुण लडाखमध्ये दरीत कोसळून गंभीर जखमी

पद्मेशच्या अपघाताची माहिती मिळताच, त्याच्या मित्रांनी सैन्याच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली. हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं त्याला लेहमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र पद्मेशची परिस्थिती खालावत चालल्यामुळे त्याला अद्यावत रुग्णालयामध्ये भरती करणं गरजेचं होतं. एबीपी माझानं पद्मेशच्या मदतीसाठी आवाहन केलं. पुण्यातल्या भाजप नेत्यानं मुख्यमंत्री कार्यालयाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वायुवेगानं सूत्र फिरली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंशी संपर्क साधण्यात आला. भामरेंच्या आदेशानंतर पद्मेशला चंदीगडमधल्या लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. चंदीगढमधल्या लष्करी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतरही पद्मेशसमोरच्या अडचणी काही संपल्या नाहीत. पद्मेश प्रमाणे अनेक उत्साही तरुण धाडसी ट्रेकिंग करतात. त्यात गैर काहीच नाही, मात्र धाडस दाखवताना योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. जर पद्मेशनंही योग्य ती काळजी घेतली असती तर कदाचित तो या संकटातून बचावला असता.

महत्त्वाच्या बातम्या

Nirmala Nawale : कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंची मोठी झेप; राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निवड
कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंची मोठी झेप; राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निवड
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Paraded Case : अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Embed widget