पुणे : आत्महत्येच्या प्रयत्नाचा अंगावर (Pune Fire) काटा आणणारा थरार पुण्यात अनुभवयाला मिळाला. आंबेगाव इथल्या सिंहगड कॉलेज परिसराती ही घटना आहे. पोलिस आणि अग्निशमन जवानांनी आत्महत्येसाठी चौथ्या मजल्यावरून उडी मारलेल्या युवकाला अक्षरशः वरच्या वर अलगद झेलून मृत्यूलाही परत पाठवण्याचा पराक्रम केला. जीवावर बेतणार हे माहित असूनही पोलीस आणि अग्नीशमन जवानांनी केलेल्या धाडसाचं कौतुक सर्वत्र होत आहे.


आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचं नाव विवेक पारखी (वय 21 वर्षे, रा.नेपाळ) असं आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता त्यानं अंबर ग्रीन सोसायटी, सिंहगड काँलेज कँपस येथील एका चार मजली इमारतीच्या टेरेसवरून खाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब परिसरातील लोकांना कळताच त्यांनी पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना कळवलं. बचाव पथक अतिशय तत्परतेनं घटनास्थळी दाखल झालं. तोपर्यंत  लोक खाली गोळा होऊन हल्लकल्लोळ करू लागले. सुमारे दीड तास हा प्रकार सुरू होता. 


आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विवेक पारखीला वरच्यावर झेलण्यासाठी बचाव पथक जाळे टाकत असतानाच विवेकने थेट टेरेसवरून खाली उडी घेतली. अगदी अखेरच्या क्षणी प्रसंगावधान दाखवत बचाव पथकानं त्याला वरच्या वर झेललं आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.


अग्निशमन दलाच्या जवानांनी कायमच उत्तम कामगिरी


पुण्यातील अग्निशमन दलाच्या जवानांनी कायमच उत्तम कामगिरी बजावली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील अग्निशमन दलातील जवान हर्षद येवले यांनी देखील कुटुंबीयांना जत्रेला घेऊन जात असताना रस्त्यावर पेट घेत असलेली गाडी पाहिली आणि जीवाची तमा न बाळगता कुटुंबीयांना सोबत घेत गाडीची आग विझवली होती. त्यांनी कुटुंबीय सोबत असताना आणि महत्त्वाचं म्हणजे सुट्टीवर असताना केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक झालं होतं. पुण्यातील उंड्री परिसरात रात्री एका चालत्या बीएमडब्ल्यू कारने अचानक पेट घेतला. त्यावेळी ऑफ-ड्युटी असलेला अग्निशमन दलाचा जवान मदतीसाठी आला. पेटलेली गाडी पाहून त्यांनी तत्परतेने आगीच्या दिशेने धाव घेत गाडीत कोणी अडकले आहे का याची प्रथम पाहणी केली. मग धर्मावत पेट्रोल पंप येथील अग्निरोधक उपकरण वापरुन बीएमडब्ल्यु-एक्सवन या पेटलेल्या वाहनाची प्राथमिक स्वरुपात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता.


इतर महत्वाची बातमी-


Pune Punit Balan : गावभर होर्डिंग्स अन् 3 कोटी 20 लाखांचा दंड; कोण आहेत पुण्यातील गणेश मंडळांना मालामाल करणारे पुनित बालन?