पुणे : पुण्यात अवैध दारु विक्री आणि दारु वाहतूक करणाऱ्यांवर पुणे विभागातील उत्पादन शुल्क विभागाच्या (Pune police) पथकाने अवैध दारू विक्री आणि खरेदी विरोधात कारवाई केली आहे. छाप्यादरम्यान 42 लाख 90 हजार रुपयांची दारू आणि कच्चा माल जप्त केला. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी छापे टाकले असून एकूण 45 गुन्हे दाखल करण्यात आले असून 48 आरोपींना अटक करण्यात आली आहे.


जप्त केलेल्या दारूमध्ये गोव्यात उत्पादित केलेल्या आणि गोव्याबाहेर विक्री करण्यास प्रतिबंधित असलेल्या दारूचाही समावेश आहे. याशिवाय, अधिकाऱ्यांनी देशी दारू बनविणाऱ्यांच्या ठिकाणी छापे टाकले. जप्त केलेल्या साहित्यात देशी दारू, विदेशी दारू, बीअर, वाईन, गोव्याबाहेर विक्रीसाठी बंदी असलेली दारू, अवैध दारू, ताडी आणि दारू तयार करण्यासाठीचा कच्चा माल यांचा समावेश आहे. या दारूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.


पोलिसांच्या धडाधड कारवाया सुरुच...


काही दिवसांपूर्वी पुणे-मुंबई महामार्गावर उर्से गावाच्या हद्दीत सापळा रचून पोलिसांनी ही गोवा (Pune police)  बनावटीची दारु जप्त केली होती. राज्य उत्पादन शुल्काने कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 62 लाख 68 हजार रुपये किमतीची दारू जप्त केलेली होती. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली होती. या मध्ये गामित सोमवेलभाई सिंगाभाई (वय 25वर्षे),व्यवसाय ट्रक चालक रा- ओटा ता. सोनगड जि. तापी गुजरात, मोहन दिनराम खथात वय 34 वर्षे व्यवसाय-ट्रक क्लिनर रा- रुध्रपुरा ता. हुरडा जि. भिलवाडा, राजस्थान यांना अटक करण्यात आली होती.


दारु विक्री करणाऱ्यांवर  पोलिसांची करडी नजर


पुण्यात अवैध दारु विक्री आणि अवैध दारु सेवन करणाऱ्या विरुद्ध विशेष मोहिम राबवली आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे 68 आणि 84 कलमानुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध जिल्ह्यात  विशेष मोहिम राबवली होती. एकूण 29 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आले होते, अशी माहिती (state excise department) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाने दिली होती. त्यानंतरदेखील कारवाईचा तडाखा सुरुच आहे.अवैध दारु विक्री करणाऱ्या किंवा वाहतूक करण्याऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.


इतर महत्वाची बातमी-


Pune Punit Balan : गावभर होर्डिंग्स अन् 3 कोटी 20 लाखांचा दंड; कोण आहेत पुण्यातील गणेश मंडळांना मालामाल करणारे पुनित बालन?