पुणे : पुण्यात ससूनमधून पळून गेलेला ड्रग्स माफिया ललित (Pune Crime News) पाटीलला (Lalit Patil) चारचाकीतून रावेतपर्यंत सोडणाऱ्या एकाला पुणे पोलिसांनी हडपसर (Sasoon Hospital Drug Racket) परिसरातून ताब्यात घेतलं आहे. काल रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दत्ता डोके असं या गाडी चालकाचं नाव आहे. ललित पाटील सोमवारी (2 ऑक्टोबरला) ससून रुग्णालयातून रात्री एक्स रेचा बहाणा सांगून पळून गेला. त्यावेळी ससूनच्या बाहेर या डोकेने त्याला मदत केल्याचं समोर आलं. डोके हा ससूनमध्ये भरती असलेल्या दुसऱ्या आरोपीच्या संपर्कात होता आणि त्याच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. 


ललित पाटील रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता ससून रुग्णालयातून निघाल्यानंतर शेजारी असलेल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलला पोहचला. तिथून रिक्षाने बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर आला. तिथे आधीच तयारीत असलेल्या दत्ता डोके याच्या कारमध्ये तो बसला. तिथून तो रावेतला पोहचला आणि तिथे त्याने दत्ता डोकेची कार सोडली आणि दुसर्‍या कारमधे बसून तो मुंबईला गेला असं पोलीसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. ललित पाटीलच्या शोधासाठी पुणे पोलीसांनी दहा पथकं तैनात करण्यात आली आहेत.


पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रॅग्स रॅकेट चालवणारा   ड्रॅग्ज माफिया ललित पाटील हा पळून गेल्यानं खळबळ उडाली होती. या घटनेचा आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं आणि याच सीसीटीव्हीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली होती. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळत नाही तर आरामात चालत निघून जातानाचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.


 सीसीटीव्ही फुटेजमधून काय समोर आलं?


ससून रुग्णालयाच्या गेट जवळ ललित पाटील पळून जाताना दिसत नाही तर ससून रुग्णालयाच्या आवारातून आणि मुख्य रस्त्यावरून शांतपणे चालत जाताना दिसतोय. त्यामुळे तो पोलिसांना हिसका देऊन पळून गेला या पोलिसांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.  त्याचबरोबर ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांची पळून जाण्यात त्याला मदत झाली का? असाही प्रश्न विचारला जात आहे. काळी टोपी आणि मास्क घालून तो सगळ्या परिसराची पाहणी करत जाताना दिसत आहे. त्यामुळे तो पळाला की त्याला पळवला यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या :


Sasoon hospital drug racket : बायको वकील, बसल्याजागी करायचा लाखोंचा व्यावहार; ससूनमधून पळालेल्या ललित पाटीलच्या ड्रग्स रॅकेटची A to Z कहाणी