Pune News:हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये पाण्याच्या टँकर भरून देण्यासाठी महापालिकेने पॉईंट उपलब्ध करून दिलेले आहेत. या पॉईंटमधूनच लाखो लिटर पाणी वाया जात आहे. टँकरमध्ये पाणी भरून झाल्यानंतर दुसरा टँकर त्याठिकाणी येईपर्यंत हे पाणी अव्याहतपणे सुरू असते.पाणी बंद करण्यासाठी त्याला कॉक नाही. त्यामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.


पुण्यात एकीकडे पाण्यासाठी लोकांची फरपड सुरु आहेत तर दुसरीकडे लाखो लीटर पाणी वाया जात असल्याचं समोर आलं आहे. याबाबत महापालिकेने तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय.


पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या फुरसुंगी, उरुळी देवाची, होळकरवाडी, हांडेवाडी,मंतरवाडी या आणि इतर वाड् वस्त्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे.येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध होत नाहीत.शहरातील अनेक भागात आजही पाणीटंचाई आहे.असं असताना महापालिकेने पाण्याच्या टँकरसाठी उपलब्ध करून दिलेल्या पॉइंटमधून रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे.


 पुणे महानगर पालिकेचा आंधळा कारभार हडपसरमध्ये दिसत आहे. टँकर भरून देण्यासाठी महापालिकेकडून 10 पॉईंट देण्यात आले आहे. मात्र यातील एकाही पॉईंटला कॉक बसवण्यात आला नाही आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे. त्यात अतिप्रमाणात पाणी वाया जात असल्याने अनेकांकडून संताप व्यक्त होत आहे. हेच पाणी जर पाणी टंचाई असलेल्या गावाला दिलं तर त्या गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल.  त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी व्हाल बसवावे. याकडे जर पुणे महानगरपालिकेने लक्ष दिलं नाही तर शिवसेनेच्या स्टाईलनमध्ये उत्तर दिलं जाईल, असा इशारा हडपसरचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी दिला आहे.