पुणे : सध्याच्या काळात लोकांमध्ये माणुसकी राहिलेली नाही असं सहज बोलता बोलता बोललं जातं. परंतु, आजच्या जमान्यातही काही लोकांमध्ये हा प्रामाणिकपणा टीकून आहे. याचा प्रत्येय पुण्यातील एका तरूणाच्या कृतीतून दिसून आलाय. रस्त्यावर पडलेलं पाकीट पुण्यातील तरूणाने प्रामाणिकपणे मुळ मालाकाल परत केलंय.  माणुसकी टिकून आहे. याची प्रचिती देणारे उदाहरण पुणेकर तरुणाने दाखवून दिलंय. नवनीत अहिरे असं या पाकीट परत करणाऱ्या तरूणाचं नाव आहे. पाकिट परत केल्यानंतर संबंधित मालकाने हा फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे तरूणाच्या या कृतीचं सध्या समाज माध्यमातून कौतुक करण्यात येतंय. 


पुणे- बंगरुळू  राष्ट्रीय महामागर्गावरून  नवनीत अहिरे हा तरूण आपल्या दुचाकीने प्रवास करत होता. यावेली  महामार्गावरील  रेनॉल्ट शोरुम परिसरात नवनीत अहिरे याला रस्त्यावर पडलेलं एक पाकीट दिसलं. या ठिकाणी ट्रॅफिक असल्याने त्याची बाईक धीम्या गतीने चालवत होता. त्यामुळे हे पाकीट त्याच्या नजरेस पडलं. चुचाकी थांबवून त्याने हे पाकीट उचलून घेतलं तर त्यात मोठी रक्कम असल्याचं त्याच्या लक्षात आलं. परंतु, पाकीट उचलून मिळालेल्या पैशांचा मोह न ठेवता पाकिटात कोणाचा पत्ता सापडतो का याचा तपास त्याने केला.


चिठ्ठीतून मिळाला मूळ मालकाचा पत्ता


नवनीत याला सापडलेल्या पाकिटात काही महत्त्वाची कागदपत्रे आणि चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीवर एक मोबाईल नंबर लिहिण्यात आला होता. चिठ्ठीमध्ये लिहिलेल्या मोबाईल नंबरवर नवनीत अहिरे याने संपर्क केला व तुमचे काही हरवले आहे का? असे विचारले असता, समोरून "हो माझे पैशाचे पाकीट हरवले आहे', अशी माहिती दिली. समोरून सांगितण्यात आलेली माहिती बरोबर असल्याने पकिटाच्या मूळ मालकाला बोलावून त्याने पाकीट सुपूर्त केले. आपले हरवलेले पाकीट परत मिळाल्याने मालकाच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव झळकत होते. पाकिट मिळताच संबंधितांनी नवनीतसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत  त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं. सोशल मीडियावरील ही पोस्ट अनेकांनी शेअर करत नवनीत यांचं कौतुक केलं. 


 सध्याच्या काळात प्रामाणिकपणा शोधून सापडत नाही, असे बोलले जाते. एखादी मोठी रक्कम हाती लागल्यास ती संबंधितांना परत दिल्याचे प्रसंगही दुर्मिळच. पण आजही माणुसकी, प्रामाणिकपणा जिवंत असल्याची प्रचिती नवनीत अहिरे या तरुणाने त्याच्या कृत्यातून दिली आहे असे सांगित सोशल मीडियावर नवनीत अहिरे याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. 


महत्वाच्या बातम्या


Pune Roof Top Hotel: पुण्यात रुफ टाॅप हाॅटेल्स आणि बारला महापालिकेचा झटका, 67 हॉटेल्सना नोटिसा


Pune : लोन अॅपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पुणे पोलिसांनी हजारो खाती गोठवली, 18 जणांना अटक