Pune Rain Death : दोन तासांपासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पुण्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. मुसळधार पावसामुळे अंगावर (Pune rain) झाड पडून एका वयोवृद्ध रिक्षा चालकाचा दुर्दैवी (Death) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील येरवडा परिसरातील राम नगर भागात ही घटना घडली. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या रिक्षावर सोसाट्याच्या वाऱ्यामुशे झाडं कोसळलं. त्यामध्ये रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. पावसामुळे रिक्षाचालकाला मदत वेळेवर पोहचली नाही. पावसामुळे या भागामध्ये प्रचंड पाणी साठले होते. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.
पुण्यात सायंकाळी चारच्या सुमारात वादळी वाऱ्यासह धुंवाधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. येरवडा, विश्रांतवाडी परिसरात धुंवाधार पावसासह गारादेखील पडल्या. मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना घडल्या. राम नगरमध्येही धुंवाधार पाऊस सुरु असताना अचानक झाड रिक्षावर कोसळलं. त्या रिक्षात वयोवृद्ध चालक बसले होते. झाड पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशामन दलाच्या जवानांनी घटनास्थळी बचावकार्य सुरु केले आहे.
संविस्तर बातमी थोड्यावेळात...