पुणे : महायुतीत आजवर अनेकदा उमेदवारांची देवाण-घेवाण झालीये, त्यामुळं शिरूर लोकसभेत तसं घडू शकतं. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवायची का? याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. त्यांनी आदेश दिल्यास मी घड्याळाचा चिन्हावर अमोल कोल्हे यांच्याशी सामना करेल, असं म्हणत शिंदे गटाचे उपनेते शिवाजी आढळरावांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचे संकेत दिलेत. फक्त हा निर्णय 6 मार्च पर्यंत होईल, असं ही त्यांनी जाहीर केलं आहे.
काय म्हणाले आढळराव पाटील?
आतापर्यंत युतीत अनेकदा उमेदवारांची देवाण घेवाण सुरु राहते. यापूर्वी राज्यात अशा प्रकारच्या देवाण घेवाण झाल्या आहेत. भाजपचे उमेदवार शिवसेनेच्या तिकिटावर लढले आहेत आणि त्यांच्या चिन्हावर देखील लढले आहेत. त्यामुळे तसे आदेश मला देण्यात आले आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमी मला तसं सांगितलं तर त्यांचा शब्द खाली पडू देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचं खुलं आव्हान
शिरुर लोकसभेतील विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचं खुलं आव्हान अजित पवारांनी दिलं आणि त्याच दिवसापासून या मतदार संघात मोठ्या घडामोडी घडू लागल्या. महायुतीत याच मतदार संघासाठीट रस्सीखेच सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन दिवसांनी याच अनुषंगाने वर्षा बंगल्यावर महत्वपूर्ण बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि याच मतदार संघातील महत्वाचं नाव म्हणजे दिलीप वळसे पाटील यांच्यात याच मतदार संघावरुन खलबतं झाली आणि अजित पवारांनी या ठिकाणी दबावाचं राजकारण केल्याचं बोललं जात आहे.
शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव या मतदार संघात लढण्याची ईच्छा व्यक्त करत आहे. मात्र अजित पवारांनी या मतदार संघावर दावा केला आणि ते राष्ट्रवादीचा उमेदवार देण्यासाठी ठाम आहे. आढळराव राष्ट्रवादीत येऊन त्यांनी अमोल कोल्हेंविरुद्ध लोकसभेच्या रिंगणात उतरावं. नाहीतर आम्ही भाजपचे प्रदीप कंद यांना राष्ट्रवादीत घेऊ आणि उमेदवारी देऊन त्यांना थेट अमोल कोल्हेंच्या विरोधात उभं ठाकू. अजित पवारांचं हे दबावतंत्र आणि या दबावाला शिवाजी आढळराव बळी पडताना दिसत आहेत.
इतर महत्वाची बातमी-