पनवेल : ज्यांनी गद्दारी केली. ज्यांनी पक्ष फोडला. आमदार पळवून महाविकास आघाडीचे सरकार पाडून नियमबाह्य सरकार बनवले. त्या सर्वांना त्यांची जागा दाखवून देण्याची (Maval Loksabha Election) वेळ आली आहे. ते आपण सर्व मिळून करणार आहोत. त्या सोबतच तरुण, कामगार, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामन्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghere) पाटील यांनी केले.


संजोग वाघेरे पाटील पुढे म्हणाले, मराठी माणसाची अस्मिता आणि स्थान मिळवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला. खरी निशाणी ही मशालच मिळाली होती. या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे पक्षाला मानणारे लोक आहेत. गद्दाराच्या हातात काहीच आलेले नाही.  सर्वच ठिकाणी पक्ष फो़डून, आमदार आणि नेते पळवून सरकारे बनवली जात आहेत. हे थांबविण्यासाठी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्र करणार आहे. ही प्रवृत्ती वाईट आणि लोकशाही विरोधी आहे. त्यांना थोपविण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे.


'तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही'


तसेच, गावागावांतील नागरिकांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्याना घेवून ते तडीस नेण्याचा प्रयत्न करू, अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. यापूर्वी ज्या प्रकारे तुमचा विश्वासाघात करण्याचे काम झाले. त्या पध्दतीने मी कुठेही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी आपल्यासोबत असेन. त्यासाठी येणाऱ्या 13  तारखेला आपल्याला फक्त शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मशाल चिन्ह लक्षात ठेवा आणि प्रचंड बहुमतांनी विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.


मावळमध्ये बारणे विरुद्ध वाघेरे लढत


मावळमध्ये बारणे विरुद्ध वाघेरे अशी लढत आहे. बारणेंना विजयी करण्यासाठी मोठ्या नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. तर वाघेरेंना विजयी करण्यासाठीदेखील वरिष्ठांच्या सभा आणि रोड शो आयोजित केले जात आहे. मावळमध्ये शिवसेना विरुद्ध उबाठा अशी लढत असल्यामुळे अनेकांचं या मतदारसंघाकडे लक्ष लागलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


lok sabha election Votting : वासुदेव आला रे, वासुदेव आला...; पिंपरी चिंचवडमध्ये वासुदेव करतायत मतदानासाठी जनजागृती


Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अमेठी लढतीवर जवळपास शिक्कामोर्तब; हायहोल्टेज लढत पुन्हा रंगणार


Yugendra Pawar Vs Ajit Pawar :विधानसभेलादेखील पवार विरुद्ध पवार लढत; अजित पवार आणि युगेंद्र पवार एकमेकांविरोधात उभे ठाकणार?