बारामती, पुणे : लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक (Baramati Loksabha election) चर्चा बारामती लोकसभा मतदारसंघाची सुरु आहे. पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरु असतानाच बारामतीत विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामतीचे आमदार आहे. त्यांच्याविरोधात विधानसभेत कोण उभं ठाकणार, असं विचारल्यास बारामतीकरांनी थेट युगेंद्र पवारांचं (Yugendra Pawar)  नाव घेतलं आहे. 


बारामतीकर म्हणाले, बारामतीला विधानसभेत नव्या चेहऱ्याची गरज आहे. त्यात युगेंद्र पवार हा तरुण आणि चांगला चेहरा आहे. आम्हाला बारामतीत नवीन आमदार हवा आहे. आतापर्यंत बारामतील अजित पवारांना निवडून आणलं त्यांना मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं. आता मात्र बारामतीचा भावी आमदार कोण विचारल्यास थेट युगेंद्र पवारांचं नाव घेतलं आहे. भावी आमदार म्हणून युगेंद्र पवारांच्या नावाला पसंती दिली आहे. 


बारामतील शरद पवारांनंतर सुसंस्कृत चेहरा आणि संयमी नेतृत्व असलेला चेहरा हा युगेंंद्र पवारांना आता बारामतीकरांना सापडला आहे. त्यात युगेंद्र पवारांना बघितलं की शरद पवारांची प्रतिकृती दिसते. त्यामुळे आता युगेंद्र पवारांच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे राहणार आहोत, असं बारामतीकर म्हणाले. 


राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीत सध्या नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होत आहे. त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. त्यानंतर अशीच तगडी लढत विधानसभेत होण्याची शक्यता दिसते आहे. मधल्या काळात अनेक गणितं बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र असं झाल्यास पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत पाहायला मिळू शकते.


कोण आहेत युगेंद्र पवार?


युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे आणि शरद पवार यांचे नातू आहेत. शरद पवारांना फॉलो करणारे युगेंद्र पवार हे बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. बारामतीतील शरयू अॅग्रोचे ते अध्यक्ष आहेत तसेच विद्या प्रतिष्ठानमध्येही विश्वस्त आहेत. फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखाना हा युगेंद्र पवार पाहतात. मात्र यंदा पहिल्यांदात ते राजकारणात सक्रिय दिसत आहे. सुप्रिया सुळेंचा प्रचार करताना सभा घेताना दिसत आहेत. 


इतर महत्वाची बातमी-


lok sabha election Votting : वासुदेव आला रे, वासुदेव आला...; पिंपरी चिंचवडमध्ये वासुदेव करतायत मतदानासाठी जनजागृती


Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अमेठी लढतीवर जवळपास शिक्कामोर्तब; हायहोल्टेज लढत पुन्हा रंगणार