पुणे: सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात अनेक धक्कादायक घटना समोर येत असल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणाहून शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या वसतीगृहात ढेकणं आढळून आली होती, त्याचबरोबर जेवणात आळ्या देखील आढळून आल्या होत्या. त्यानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फूड कॅन्टीनच्या जेवणात चक्क रबर निघाल्याची घटना समोर आली आहे. विद्यापीठात जेवणाच्या बाबतीत वारंवार हलगर्जीपणा समोर आल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत.


फ्राईड राईसमध्ये रबर आढळल्याचा दावा


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फूड कोर्टमधील 'Route 93' या चायनीज गाळ्यामध्ये हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जेवणात रबर आढळल्याचा आरोप केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सायंकाळी जेवणाच्या वेळी फ्राईड राईस आणि नूडल्स मागवले होते. त्यावेळी फ्राईड राईस आणि नूडल्स खात असताना फ्राईड राईसमध्ये रबर आढळून आल्याचं समोर आलं आहे.


पुणे विद्यापीठात फ्राईड राईसमध्ये रबर आढळल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फूड कॅन्टीनच्या जेवणात चक्क रबर निघालं. पुणे विद्यापीठाच्या फूड कोर्टमधील Route 93 या चायनीज गाळ्यात हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जेवणात रबर आढळल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांनी बुधवारी सायंकाळी जेवणाच्या वेळी फ्राईड राईस आणि नूडल्स मागवले असताना त्यात रबर निघालं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यापीठाकडून समिती स्थापन करत चौकशी करण्यात येणार आहे.