पुणे: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून रिलेशनशीपमध्ये असताना तरुणीचे शरीर संबंधाच्यावेळी नकळत काढलेले नग्न अवस्थेतील व्हिडिओ इंटरनेटवरती पोर्न साईटवर व्हायरल केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणीचे शरीर संबंधाच्या वेळी नकळत काढलेले नग्न अवस्थेतील व्हिडिओ इंटरनेटच्या पोर्न साईटवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत एका 24 वर्षाच्या तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विनय शिरीष कुलकर्णी (वय 27, रा. फुलेवाडी, रिंगरोड, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 30 डिसेंबर 2023 ते 12 मे 2025 या दरम्यान घडला असल्याची माहिती आहे.
घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी एका कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरी करीत आहे. विनय कुलकर्णी हा अॅटोमोबाईल इंजिनिअर आहे. 2 वर्षांपूर्वी या दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यातून दोघांच्या सहमतीने शरीरसंबंध निर्माण झाले होते. त्यावेळी तिच्या नकळत विनय कुलकर्णी याने तिचे नग्न अवस्थेतील व्हिडीओ काढले होते. काही कारणाने त्यांच्यामध्ये ब्रेकअप झाला. या तरुणीने विनय कुलकर्णी याला लग्नासाठी नकार दिला. त्यानंतर गेल्या एक वर्षांपासून त्यांच्यामध्ये कोणताही संपर्क नव्हता. यादरम्यान तरुणीच्या एका मैत्रिणीला पोर्न साईटवर तिचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ दिसला. या मैत्रिणीने तिला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर या तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे तपास करीत आहेत.
लग्नाला नकार दिला म्हणून केलं कृत्य...
तरुणीने विनय कुलकर्णी याला लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने तिचा रिलेशनशीपमध्ये असतानाचा काढलेला प्रायव्हेट व्हिडीओ पोर्न साईटवर शेअर केला. तरुणीशी शरीरसंबंध ठेवत असल्याच्या वेळी तिच्या नकळत काढलेले व्हिडिओ तरुणाने इंटरनेटवरील पॉर्न साईटवर अपलोड केले. हे व्हिडीओ पिडीत तरूणीच्या मैत्रिणीला आढळल्यानंतर तिने याबाबतची माहिती दिली. याबाबत एका 24 वर्षांच्या तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विनय शिरीष कुलकर्णी (वय 27, रा. फुलेवाडी, रिंगरोड, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 30 डिसेंबर 2023 ते 12 मे 2015 या दरम्यान घडला आहे.
काय आहे प्रकरण?
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी एका कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरी करीत आहे. विनय कुलकर्णी हा अॅटोमोबाईल इंजिनिअर आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्यामध्ये मैत्री आणि त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यातून दोघांच्या सहमतीने त्यांच्यात शरीरसंबंध निर्माण झाले. त्यावेळी नकळत विनय कुलकर्णी याने तरूणीचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ काढले होते.
काही कारणाने त्यांच्यात ब्रेकअप झालं आणि ते वेगळे झाले. या तरुणीने विनय कुलकर्णी याला लग्नास नकार दिला होता. त्यानंतर गेल्या एक वर्षापासून त्यांच्यात संपर्क नाही. या तरुणीच्या एका मैत्रिणीला पॉर्न साईटवर तिचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ दिसला. या मैत्रिणीने तिला याची माहिती दिली. त्यानंतर या तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे तपास करीत आहेत.