पुणे : आपल्यातील प्रत्येकजण झोमॅटोवरुन(Zomato) खाद्यपदार्थ मागवतो. अनेकदा यासंदर्भात तक्रारीदेखील करतो. मात्र पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पुणेकराने पनीर बिर्याणीत चिकनचे तुकडे आढळल्याचा दावा केला आहे. पंकज शुक्ला असं या पुणेकराचं नाव आहे. त्याने या पनीर बिर्याणीत चिकनचे तुकडे असल्याचा फोटो आणि व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा तरुण शाकाहारी आहे. घडलेल्या या प्रकारामुळे त्यांच्या भावना दुखावल्या असल्याचं त्याने ट्विटरवर लिहिलं आहे. 


पुण्यातील कर्वे नगरयेथील प्रसिद्ध ह़ॉटेलमधून पंकज शुक्ला यांनी पनीर बिर्याणी मागवली होती. त्यात थेट चिकनचे तुकडे सापडले. हे तुकडे पाहून शाकाहारी पुणेकर असलेला शुक्ला नावाचा तरुण संतापला आणि त्याने झोमॅटोकडे तक्रार केली त्यानंतर त्या रिफंड मिळाले आहेत मात्र त्याच्या धार्मिक भावना दुखावल्याचं त्याने ट्विटर पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्याने झोमॅटोकडे तक्रार दिली आहे. त्यावर झोमॅटोनेदेखील स्पष्टीकरण दिलं आहे.  फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने आपल्या अधिकृत कस्टमर केअर अकाऊंटद्वारे शुक्ला यांच्या पोस्टला त्वरित प्रतिसाद दिला आणि आम्हाला कोणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या नाही आणि तसा आमचा हेतूदेखील नाही. ग्राहक हे आमच्यासाठी प्रथम प्राधान्य आहे. तुम्ही तुमचा आयडी आणि फोन नंबर पाठवा आम्ही या संदर्भातील सगळी तपासणी करु, असं उत्तर झोमॅटोकडून देण्यात आलं आहे. 


या प्रकरानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी झोमॅटो अॅपवर तर अनेकांनी हॉटेल मालकावर संताप व्यक्त केला आहे. असे प्रकार घडतातच कसे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यासोबतच झोमॅटो साधं व्हेज आणि नॉन व्हेजचा वेगळेपणा जपता येत नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत एका युजरने झोमॅटो कंपनीवर संताप व्यक्त केला आहे. 






काही दिवसापूर्वीत झोमॅटोने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 'Pure Veg Fleet' आणि 'Pure Veg Mode' लॉन्च केलं होतं. त्यात  प्युअर व्हेज मोडमध्ये फक्त व्हेज ग्राहकांसाठी रेस्टॉरंट्सचा समावेश केला आहे. ज्या हॉटेल्समध्ये मांसाहारी पदार्थ मिळतात अशा रेस्टॉरंट्सना यापासून दूर ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. या निर्णयावरुन मोठी टीका करण्यात आली होती. त्यानंतरच हा प्रकार समोर आला आहे. 


ही बातमी वाचा: