पुणे : पुण्यातील पोर्शे कार (Pune Porshe Car Accident)  अपघातात अल्पवयीन मुलगा कारणीभूत असल्याचं समोर आल आणि आता FC रोड वरील ड्रग्ज प्रकारणातदेखील काही अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांमधीला नशेचा मुद्दा किती गंभीर आहे?  हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय आणि त्यामुळेच पुण्यातील अनेक पालांनी त्यांचा अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी डिटेक्टिवची मदत घायचं ठरवलंय. गेल्या काही दिवसात अनेक पालकांनी डिटेक्टिव्हशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. 


 पुण्यातील FC रोडवरील L3 लाउंजमध्ये ड्रग्ज घेणारे  पार्टीत अल्पवयीन मुलं सहभागी झाले होते, असाही दावा केला जात आहे. त्यामुळे  दारू किंवा कोकेनसारखे अमली पदार्थ असेल… अल्पवयीन मूलं नशेच्या आहारी जात असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. कल्याणी नगर अपघातातदेखील विशाल आणि शिवनी अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगाच कारणीभूत ठरला होता. त्यामुळे पुण्यातील अंमली पदार्थाचा हा विळखा आपल्या मुलांवर पडू नये, यासाठी अनेक पालक डिटेक्टिव्हची मदत घेत आहेत. 


पाल्यांवर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टिव्हची मदत


अल्पवयीन मुलं शाळा आणि महाविद्यालयात शिकणारी आहेत. या मुलांवर ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने लक्ष ठेवणं, त्यांच्या मागावर काही लोक पाठवणं आणि त्यांच्या मित्रमंडळी कोण आहे याची माहिती घेणं, ही सगळी आव्हान या डिटेक्टिव्ह समोर आहे. अनेक मुलांचा पाठलाग करण्याचं, त्यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्याचं काम डिटेक्टिव्ह एजन्सी करते. मुळात आपल्या पाल्यांवर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टिव्हची मदत घायला लागणंच हे आपल्या बदललेल्या समाज व्यवस्थेचं आणि कुटुंब व्यवस्था किती बदलली आहे हे दर्शवणार आहे.  मात्र डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घेण्याबरोबरच या पालकांनी आपल्या मुलांवर लहानपणापासून मुळात चांगले संस्कार कारणं आणि दक्षता घेण्याची देखील गरज आहे. 


पालकांवर दुर्दैवी वेळ


पाठलाग करण्यासाठी मुलांच्या मागावर  काही लोक पाठवणं, मुलं कुठे जातात, काय करतात आणि त्यांची मित्रमंडळी कोण? याची बारीक माहिती घेणं, ही आव्हानं या  डिटेक्टिव्ह समोर असणार आहेत. मुळात आपल्या पोटचा गोळा असणाऱ्या मुलांवर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टिव्ह नेमावे लागणं, ही दुर्दैवी वेळ पालकांवर येऊन ठेपलीयबदललेल्या समाजव्यवस्थेची, कुटुंबव्यवस्थेची तसेच मुलांवर केल्या जाणाऱ्या संस्कारांचीही खऱ्या अर्थाने परीक्षाच आहे. ज्याचा निकाल फक्त पालकांच्या हाती आहे.


Video :