पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा (Maratha Reservation) देण्यासाठी पुण्यात मुस्लिम (Muslim Protest) समाज रस्त्यावर उतरला आहे. राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बेमुदत उपोषण (Hunger Strike) सुरू केले. राज्यभरही मराठा समाजबांधवांचे उपोषण सुरू आहे. याच मागणीला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून पुण्यात लाक्षणिक उपोषण केलं जात आहे. 


मराठ्यांसाठी मुस्लिम मावळे एकवटले


पुण्यात विविध ठिाकणी सकल मराठा समाज बांधव हे साखळी उपोषण करत आहे. समाजाला शासनाने आरक्षण द्यावे ही मागणी रास्त असून शासनाने आरक्षणाबाबत तातडीने कार्यवाही करावी, मराठा समाजाला न्याय द्यावा, यासाठी पुण्यात मुस्लिम समाजाने पाठिंबा दिलेला आहे. तरी शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होईल, असेही मुस्लिम बांधवांनी सांगितले आहे. 


मुस्लिम मावळ्यांकडून एक मराठा लाख मराठाचा गजर


मराठा आरक्षणासाठी राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्या मराठ्यांना साखळी आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या आवाहनानंतर राज्यात सगळीकडे साखळी उपोषण सुरु आहे. त्यातच पुण्यातही अनेक ठिकाणी राखळी उपोषण केलं जात आहे. औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे, बोपोडी आणि शिवाजीनगर येथील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चासह अनेक मराठा संघटनांनी आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात आजपासून सुरू होत आहे. त्यामुळे या भागात राजकीय नेत्यांना गावबंदी  करण्यात आली आहे.


आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही; मनोज जरांगे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत आरक्षणाबाबत चर्चा झाली. मनोज जरांगे म्हणाले, आपण मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले, नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही. आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही, हे त्यांना स्पष्ट सांगितले. आम्ही अभ्यासकांची बैठक बोलावली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा 2004 चा GR दुरुस्त करा. शेतीच्या आधारावरच आरक्षण दिलेले आहे. कितीही बहाणे सांगितले तरी, आम्ही ऐकणार नाहीत. समितीकडे भरपूर पुरावे आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. 60 -65 टक्के मराठा समाज अगोदरच ओबीसीमध्ये आहे, आम्ही थोडे राहिलेलो आहोत. विशेष अधिवेशन घ्या. ज्याचा कुणबी प्रमाणपत्राला विरोध आहे, त्यांनी घेऊ नका. शेतीची लाज वाटण्याएवढे मराठे खालच्या पातळीवर नाहीत. मराठवाड्यात कागदपत्रे जमा करा आणि सर्व महराष्ट्राला आरक्षण द्या. विशेष अधिवेशन घ्या,समितीचा प्रथम अहवाल स्वीकारून तिला राज्याचा दर्जा द्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मराठा आंदोलनाचा गैरफायदा घेणाऱ्या समाजकंटकांना अटक करा; पोलीस महासंचालकांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश