Maharashtra Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) आंदोलनादरम्यान राज्यात झालेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री (Cm Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्र्यांच्या (DCM) उपस्थितीमध्ये काल (सोमवार, 30 ऑक्टोबर, 2023) कायदा आणि सुव्यवस्थेची बैठक पार पडली. रात्री दहा ते अकरा अशी एक तास बैठक चालली. या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनांचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये आंदोलनादरम्यान मालमत्तेचा आणि जीवितहानी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे, गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, राज्यात हिंसक वातावरण तयार होत असेल, तर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या बैठकीला राज्यातले सर्व जिल्हाधिकारी पोलीस प्रमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सोमवारी कायदा आणि सुव्यवस्थेची बैठक पार पडली. तासभर चाललेल्या बैठकीत पोलीस महासंचालकांनी राज्यभरात झालेलं मराठा आंदोलन आणि त्यादरम्यान झालेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनांचा आढावा समोर ठेवला. मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा काही समाजकंटक घेत आहेत. या समाजकंटकांचा शोधण्याचं काम सुरू आहे. घरं जाळणं, त्यातून चोऱ्या करण्याचा उद्देश समाजकंटकांचा आहे. जे या आंदोलनांचा गैरफायदा घेऊ शकतात. या समाजकंटकांना आळा घालण्यासाठी पोलीसांच्या विविध तुकड्या करत आहेत. गुप्तचर यंत्रणा यावर काम करत आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर ठेवली.
सीएम डीसीएम आणि पोलीसांच्या बैठकीत काय काय घडलं?
- पोलीस महसंचालक यांनी दिवसभराच्या घडामोडींचा आढवा समोर ठेवला.
- मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा काही समाजकंटक घेत आहेत.
- या समाजकंटकांचा शोधण्याचं काम सुरू आहे.
- घरं जाळणं, त्यातून चोऱ्या करण्याचा उद्देश समाजकंटकांचा आहे. जे या आंदोलनांचा गैरफायदा घेऊ शकतात.
- या समाजकंटकांना आळा घालण्यासाठी पोलीसांच्या विविध तुकड्या करत आहेत
- गुप्तचर यंत्रणा यावर काम करत आहेत.
राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांची बैठक
मराठा आंदोलनाबाबत सरकार गंभीर असल्याचा संदेश देत मुख्यमंत्री राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेणार असल्याची माहिती आहे. या बैठकीच्या माध्यमातून मराठा आंदोलन, सद्य स्थिती आणि कायदा, सुव्यवस्था यांचा आढावा घेणार आहेत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात संचारबंदी आणि जमावबंदी लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.