Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 18 Oct 2021 08:23 AM
राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे आमदार अशोक पवार यांना निनावी पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्यातील शिरुरचे आमदार अशोक पवार यांना निनावी पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आलीय.  त्यानंतर आमदार अशोक पवार यांच्याकडून शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही अशोक पवारांना फोन करुन याची माहीती घेतलीय.  अशोक पवार यांच्या घरच्या पत्त्यावर आणि शिरुरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या पत्त्यावर हे निनावी पत्र धाडण्यात आलय.  आमदार अशोक पवारांनी हे पत्र कोणी लिहिलं असावं हे सांगता येणार नाही मात्र ज्यानी लिहलय तो शिरुरच्या राजकारणातील जाणकार असावा असं पत्रातील मजकूरातुन वाटतय असं म्हटलय. 



फसवणुकीच्या गुन्हात फरार असलेल्या किरण गोसावीच्या असिस्टंटला पुणे पोलिसांकडून अटक

फसवणूकीच्या गुन्हात फरार असलेल्या किरण गोसावीच्या असिस्टंटला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.  शेरबानो कुरेशी असं या महिला असिस्टंटचे नाव आहे.  2018 मध्ये पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची मलेशियात नोकरी लावतो म्हणून किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी तीन लाखांची फसवणूक केली होती.  त्यानंतर 2018 मधे दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.  याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतुन अटक केलीय. तर किरण गोसावीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलीसांची दोन पथकं कार्यरत आहेत.  महाराष्ट्रा बरोबरच इतर राज्यांमध्ये किरण गोसावीचा शोध घेतला जातोय.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून उपायुक्त नितीन ढगे यांना अटक, दोन कोटी 81 लाख रुपयांची बेनामी मालमत्ता

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेले जात पडताळणी विभागातील उपायुक्त नितीन ढगे यांची आतापर्यंत दोन कोटी 81 लाख रुपयांची बेनामी मालमत्ता आढळून आली आहे. यामध्ये एक कोटी 28 लाख रुपयांची रोकड, दोन फ्लॅट, एक दुकान यांचा समावेश करण्यात आहे. नितिन ढगेला जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी एक लाख नव्वद हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. 

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मध्यरात्री पुण्यात मोठी कारवाई; उपाआयुक्तांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Pune News : पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल मध्यरात्री पुण्यात मोठी कारवाई करत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आणि उपआयुक्त नितीन ढगे यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. नितीन चंद्रकांत ढगे (वय 40) असे पकडण्यात आलेल्या उपआयुक्त यांचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



नितीन ढगे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात उपआयुक्त आहेत. तसेच ते जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य देखील आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी त्यांनी जिल्हा जात पडताळणी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी लोकसेवक नितीन ढगे यांनी त्यांच्याकडे 8 लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात 3 लाख रुपयांची लाच मागण्यात आली. त्यानुसार मध्यरात्री सापळा कारवाईत तडजोडीअंती 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. 

 

नितीन ढगे यांच्यावर सापळा कारवाई केल्यानंतर त्यांच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली आहे. या झडतीमध्ये ढगे यांच्या घरामध्ये तब्बल सव्वा कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. या रकमेपैकी किती रक्कम वैध आणि किती अवैध आहे याची तपासणी अद्यापही सुरु आहे.

फसवणुकीच्या गुन्हात फरार असलेल्या किरण गोसावीच्या असिस्टंटला पुणे पोलिसांकडून अटक

Pune News : फसवणुकीच्या गुन्हात फरार असलेल्या किरण गोसावीच्या असिस्टंटला पुणे पोलिसांकडून अटक. शेरबानो कुरेशी असं या महिला असिस्टंटचे नाव आहे. 2018 मधे पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची मलेशियात नोकरी लावतो म्हणून किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी तीन लाखांची फसवणूक केली होती. त्यानंतर 2018 मधे दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.  याच गुन्हयात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतुन अटक केलीय. तर किरण गोसावीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलीसांची दोन पथकं कार्यरत आहेत.  महाराष्ट्रा बरोबरच इतर राज्यांमध्ये किरण गोसावीचा शोध घेतला जातोय. 

Pune News : 19 महिने बंद असलेली एक्सप्रेस आजपासून मुंबई पुणेकरांच्या सेवेत दाखल; नोकरदार वर्गाला मोठा दिलासा

Pune News : मुंबई मार्गावर सिंहगड एक्सप्रेस  गेल्या 19 महिन्यांपासून बंद होती ही रेल्वेगाडी प्रशासनाने कोरोनामुळे बंद केली होती. ती आजपासून सुरु झाली आहे. आज स्टेशन मास्तर यांनी गाडीच्या पाटीला हार घालून स्वागत केलं. आजपासून ही गाडी मुंबई आणि पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. पुण्यावरून ही रेल्वेगाडी (क्र. 01009) सकाळी 6 वाजून 05 मिनिटांनी निघाली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादर या स्थानकांवर थांबेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी निघेल आणि रात्री 10 वाजता पुण्यात पोहोचेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. पुणे आणि मुंबईत काम करणाऱ्या  कर्मचाऱ्यांना मुंबईला ये-जा करण्यासाठी ही गाडी महत्वाची आहे.

Pune Accident : पुणे-मुंबई महामार्गावर दुचाकीस्वारांचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Pune Accident : पुणे-मुंबई महामार्गावर सुसाट वेगाने निघालेल्या दुचाकीवरील दोघांचा अपघातात जागीच मृत्यू झालाय. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेने या अपघाताची भीषणता लक्षात येते. कारण अपघातानंतर दुचाकीने देखील पेट घेतला. तर मृत तरुण आणि तरुणीमध्ये 40 ते 50 फुटांचे अंतर होते. पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी परिसरात हा अपघात रविवारच्या दुपारी झाला. दापोडी वरून हे तरुण आणि तरुणी निगडीच्या दिशेने निघाले होते. गाडीचा वेग सुसाट होता, अचानकपणे तरुणाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी स्लिप झाली. पुणे-मुंबई महामार्गातून सर्व्हिस रोडला येणाऱ्या डिव्हायडरला धडकली. तरुण एका बाजूला आणि तरुणी दुसऱ्या बाजूला फेकली गेली. तर गाडीने देखील जागीच पेट घेतला. सीसीटीव्हीतील या दृश्याने अपघाताची भीषणता लक्षात येते. तरुण-तरुणीच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. हीच दुचाकी पुढच्या एका दुचाकीला धडकल्याने त्यावरील दोघे किरकोळ जखमी झाले. 

पार्श्वभूमी

Pune : महिला लेफ्टनंट कर्नलच्या आत्महत्येप्रकरणी ब्रिगेडियरवर गुन्हा दाखल


पुण्यात लष्कराच्या मिलीटरी इंटलिजन्स ट्रेनिंग स्कूलमधील  लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या महिलेच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी हिमाचल प्रदेश मधील आर्मी ट्रेनिंग कमांड येथील लष्कराच्या ब्रिगेडियरवर (सुपिरियर आर्मी ऑफिसर) गुन्हा दाखल केला आहे. अजित मिलू असं गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात 43 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला होता. 43 वर्षीय महिला अधिकाऱ्याने आत्महत्या केली होती. 


लष्कराच्या मिलिटरी इंटलिजन्स ट्रेनिंग स्कूल येथे महिला अधिकारी आल्या होत्या. त्यांची जयपूर येथे पोस्टिंग होती. त्यांचे पती देखील लष्करात अधिकारी आहेत. त्यांना एक मुलगा आहे. दरम्यान, सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी त्या आल्या होत्या. तीन महिन्यांपासून प्रशिक्षण घेत होत्या. निवासी खोलीत राहत असताना बुधवारी सकाळी त्यांनी खोलीतच गळफास घेतल्याचे आढळून आलं होतं. यामुळे खळबळ उडाली होती.


या प्रकरणी पूणे पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. त्याचा तपास सुरू होता. दरम्यान, ब्रिगेडियरवर अजित मिलू यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान अजित हे हिमाचल प्रदेश येथे आर्मी ट्रेनिंग सेंटरच्या हेडकॉर्टर येथे सुपिरियर आर्मी ऑफिसर (ब्रिगेडियर) या पदावर आहेत. त्यांनी महिला अधिकारी एकट्या असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांच्याशी प्रेमाचे नाटक केले. त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवले. तसेच त्याचे व्हिडीओ आणि फोटो काढून ते व्हायरल करून त्यांची बदनामी करण्याची धमकी देत असल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास  करत आहेत. 


Pune : वाहतूक पोलिसाला कारवरुन 700 मीटर फरफटत नेलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार


गेल्या काही दिवसात वाहतूक पोलिसांवर अरेरावी करणाऱ्या आणि दंडाची रक्कम भरण्यास नकार देणाऱ्याची संख्या वाढली आहे. तसेच कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनेमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आपलं कर्तव्य करताना वाहतूक पोलिसांना आपला जीव मुठीत धरुन काम करावं लागतं आहे. पुण्यातही असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडलाय. आधीच्या थकलेल्या वाहतूक नियमभंगाच्या दंडाची 400 रुपयांची रक्कम भरायला सांगितल्यानंतर एका कार चालकाने वाहतूक पोलीस हवालदार यांच्या अंगावर गाडी घातली आणि त्यांना 700 ते 800 मीटरपर्यंत फरफटत नेलं. 


पुण्यातील मुंढवा सिग्नल चौकात शुक्रवारी दुपारी सव्वाचारच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी पुण्यातील मुंढवा पोलिसांनी कार चालक प्रशांत श्रीधर कांतावर याला अटक केली आहे. पोलिसांनी प्रशांत कांतावर याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक राजगुरु यांच्या देखरेखीखाली पोलीस हवालदार शेषराव जायभाय व त्यांचे सहकारी वाहनांवरील पूर्वीच्या ऑनलाईन खटल्यांची दंडाची रक्कम वसुल करण्यासाठी कारवाई करत होते. त्यावेळी मुंढवा सिग्नल चौकात प्रशांत कांतावर हा कार घेऊन आला. तेव्हा पोलीस हवालदार शेषराव जायभाय यांनी प्रशांत कांतावर याच्या गाडीवर पूर्वीचा 400 रुपयांचा दंड आहे आणि तो भरण्यास सांगितले. तेव्हा कांतावर याने दंडाची रक्कम न भरता जायभाय यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या हेतूने गाडी घातली. जायभाय हे गाडीच्या बोनेटवर पडले असताना तशाच स्थितीत ती गाडी जवळपास 700 ते 800 मीटरपर्यंत फरफटत नेले. 


पुण्यामध्ये वाहतूक पोलिसांच्या कारवाईला प्रतिसाद न देता त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करण्याच्या घटना वाढत आहेत. गेल्या काही दिवसातील ही दुसरी घटना आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.