Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
पुणे - लोणावळा रेल्वे मार्गावरील कामशेत - तळेगाव सेक्शन मधील रेल्वे फाटक संख्या 49 (वडगांव गेट), रेल्वे किमी 153/9 -154/0, रविवार 17 ऑक्टोबर सकाळी 08.00 वाजल्यापासून सोमवार 18 ऑक्टोबर संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. रेल्वे फाटक सं. 47, (जांभूळ गेट) रस्ता वाहतुकीसाठी पर्याय म्हणून उपलब्ध असेल.
रेल्वे फाटक संख्या 31, जे पुणे - सातारा रेल्वे मार्गावर वाल्हा व नीरा स्टेशन दरम्यान किलोमीटर 82/ 3-4 च्या जवळ आहे. सोमवार दिनांक 18 ऑक्टोबर सकाळी 08.00 वाजल्यापासून ते बुधवार 20 ऑक्टोबर सकाळी 08.00 वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाया पडत पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आशीर्वाद घेतला. ढोरे या भाजपाच्या नगरसेविका असताना त्यांनी हा आशीर्वाद घेतल्याने उपस्थितांमध्ये तर्क-वितर्क लढवायला सुरुवात झाली. येत्या फेब्रुवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपमधील अनेक विद्यमान नगरसेवक संपर्कात असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. त्यानंतर महापौरांनी असा आशीर्वाद घेतल्याने या चर्चांना उधाण आलं.
पुणे-मुंबई लोहमार्गालगत काही दुरुस्तीची कामं सुरू आहेत. त्यामुळं खालील रेल्वे फाटक बंद राहणार आहेत.
1 पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावरील कामशेत – तळेगाव सेक्शन मधील रेल्वे फाटक संख्या 49 (वडगांव गेट), रेल्वे किमी 153/9 -154/0, रविवार 17 ऑक्टोबर सकाळी 08.00 वाजल्यापासून सोमवार 18 ऑक्टोबर संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. रेल्वे फाटक सं. 47, (जांभूळ गेट) रस्ता वाहतुकीसाठी पर्याय म्हणून उपलब्ध असेल.
2 रेलवे फाटक संख्या 31, जे पुणे – सातारा रेल्वे मार्गावर वाल्हा व नीरा स्टेशन दरम्यान किलोमीटर 82/ 3-4 च्या जवळ आहे , सोमवार दिनांक 18 ऑक्टोबर सकाळी 08.00 वाजल्यापासून ते बुधवार 20ऑक्टोबर सकाळी 08.00 वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील.
शरद पवार अडीच वाजता पिंपरी चिंचवडचा दौरा सुरू करतील. पालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयात दहा आयसीयू बेडचा शुभारंभ ते करतील. 3:45 वाजता पत्रकार परिषद घेतील.
शरद पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. पवार यांची पत्रकार परिषद 3:30 वाजता होईल मग पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी बैठक घेणार आहेत.
पुणे शहरात काल नव्याने 87 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ५ लाख ०२ हजार ९८५ इतकी झाली आहे.शहरातील १६० कोरोनाबाधितांना काल डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ९२ हजार ७५० झाली आहे. पुणे शहरात काल एकाच दिवसात ६ हजार ८६८ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३४ लाख ६९ हजार ५४८ इतकी झाली आहे.पुणे शहरात उपचार घेणाऱ्या १ हजार १७५ रुग्णांपैकी १७७ रुग्ण गंभीर तर २२५ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.पुणे महापालिका हद्दीत नव्याने एका कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ९ हजार ०६० इतकी झाली आहे.
पार्श्वभूमी
Pune News Latest Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
काल दिवसभरात अवघे 87 नवे कोरोनाबाधित !
पुणे शहरात काल नव्याने 87 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ५ लाख ०२ हजार ९८५ इतकी झाली आहे.शहरातील १६० कोरोनाबाधितांना काल डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ९२ हजार ७५० झाली आहे. पुणे शहरात काल एकाच दिवसात ६ हजार ८६८ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३४ लाख ६९ हजार ५४८ इतकी झाली आहे.पुणे शहरात उपचार घेणाऱ्या १ हजार १७५ रुग्णांपैकी १७७ रुग्ण गंभीर तर २२५ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.पुणे महापालिका हद्दीत नव्याने एका कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ९ हजार ०६० इतकी झाली आहे.
आज शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर
कालपासून अजित पवार पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत तर आज शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. पवार यांची पत्रकार परिषद 3:30 वाजता होईल मग पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी बैठक घेणार आहेत.
पुण्यात रिक्षाची भाडेवाढ
पुण्यात रिक्षाची भाडेवाढ करण्यात आली आहे. 8 नोव्हेंबर 2021 पासून रिक्षा भाडेवाढ लागू होणार आहे. यासंदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन आधिकारी यांनी पत्र काढले आहे. पहिल्या दीड किलोमीटरला सध्या 18 रुपये भाडे घेतले जायचे ते आता 20 रुपये असेल,तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला आता 12.19 पैसे घेत होते ते आता नवीन नुसार 13 रुपये घेण्यात येणार आहेत. काल पुण्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत पुणे,पिंपरी चिंचवड व बारामती प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थितीत होते. आता या भाडेवाढीमुळं आता पुणेकरांना डिझेल पेट्रोल गॅस नंतर आता ऑटो रिक्षावाढ दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -