Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 02 Dec 2021 08:46 AM
पुण्याच्या आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि कडाकाच्या थंडीमुळं तब्बल 250 शेळ्या-मेंढ्या दगावल्या

पुण्याच्या आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि कडाकाच्या थंडीमुळं तब्बल 250 शेळ्या-मेंढ्या दगावल्या


 1)धोंडमाळ शिवार मध्ये पावसामुळे व गारवामुळे 30 ते 35 मेंढरू मृत्युमुखी पडले आहेत
2)शिंगवे (२०-२५)  आणि
 3)खडकी(४०-४५) मेंढ्या रात्री पडलेल्या पावसामुळे मृत्युमुखी पडल्या आहेत.
4)पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे येथील 3 मेंढ्या रात्री मृत्युमुखी पडलेल्या आहे .....
5)Kathapur bu  32 मेंढ्या रात्री पडलेल्या पावसामुळे मृत्युमुखी पडल्या आहेत.
6)वळती येथे रात्री झालेल्या पावसामुळे खंडू कोळेकर 12 , सिदधा माने 6, राजू माने 5 याप्रमाणे मेंढ्या दगावले आहेत 
7)पांडुरंग येसू गुलदगड ,गाव पळशी,गडेझाक, तालुका पारनेर जिल्हा नगर  यांच्या 25 बकरे पावसात भिजून व थंडीने गाव निघोटवाडी दस्तुरवादी येथे दगावली आहेत


तर जुन्नर तालुक्यातील ओतूरमध्ये 40 मेंढ्या-शेळ्यांचा मृत्यू झालाय.

उजनी धरण 104 टक्के भरले; नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

पुणे परिसर आणि उजनी धरण परिसरात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणामध्ये मोठा पाण्याचा विसर्ग येऊ लागल्याने धरणातून पाणी सोडण्याची वेळ येणार आहे . त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . सध्या उजनी धरण 104 टक्के भरले असून धरणात 25 हजार क्यूसेक पेक्षा जास्त विसर्गाने पाणी येऊ लागले आहे.

पुण्यात रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस पडत होता.. पण पहाटेपासुन थांबलाय.

 



पार्श्वभूमी

पुण्यात रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस पडत होता.. पण पहाटेपासुन थांबलाय.




 


पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत निवडणुकी दरम्यान कलम 144 लागू


पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत होणाऱ्या निवडणुकी दरम्यान कलम 144 लागू झालंय. देहू नगरपंचायत निवडणुकीसाठी हे कलम 13 डिसेंबरपर्यंत लागू असेल. तर 27 ग्रामपंचायतीत पोट निवडणूक होत आहे. त्यामुळं त्या हद्दीत 27 डिसेंबर पर्यंत हे कलम लागू असेल.


नोकरभरतीमध्ये पेपरफुटीचं रॅकेट! आरोपीचा जबाब 'माझा'च्या हाती, गृहमंत्र्यांकडूनही गंभीर दखल 


नोकरभरतीमध्ये पेपरफुटीचं रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एबीपी माझानं केल्यानंतर आता या प्रकरणातील आरोपी अनिल चव्हाणके यांनं पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिलेला जबाब माझाच्या हाती लागला आहे. आरोग्य भरतीचा पेपर कोल्हापूरमधील राहुल पाटील यानं 24 ऑक्टोबरला व्हॉट्सअॅपवर पाठवल्याचं चव्हाणके यानं जबाबात म्हटलंय. तर नाशिक पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या आणि पोलीस अकादमी चालवणाऱ्या रवींद्र दिघे यानं पिंपरी चिंचवड पोलीस आणि नायगावमधील पोलीस भरतीत इच्छुक उमेदवारांना भरती करून देऊ असं म्हटलंय. त्यामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झालेत. दरम्यान एबीपी माझाच्या बातमीनंतर या प्रकरणाची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दखल घेतली आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर पेपरफुटीच्या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश वळसे पाटील यांनी दिले आहेत. 


पुण्यात पहिली ते सातवीच्या शाळा 15 डिसेंबरपर्यंत बंद राहणार, पुणे महानगरपालिकेचा निर्णय


पुण्यासह राज्यातील महत्वाच्या शहरांमधील शाळांची संभ्रमाची घंटा आता थांबली आहे. पहिलीपासूनच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला खरा पण त्याला अनेक शहरांमधील स्थानिक प्रशासनानं विरोध दर्शवलाय. त्यानुसार आता पुणे शहरातील  शाळा उद्यापासून सुरु होणार नाहीत.  पुण्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा  15 डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहेत. राज्यातील प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असला तरी पुण्यात  मात्र, 15 डिसेंबरपर्यंत पहिली ते सातवीच्या सुरूबंदच ठेवण्यात येणार आहेत.  जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन या संदर्भातील निर्णय 15 डिसेंबरनंतर घेण्यात  येणार आहे. शाळा सुरू होईपर्यंत ऑनलाइन वर्ग सुरूच राहणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. 


 




- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.