Lalit Patil Drus Case : ललित पाटील प्रकरणात संशयाच्याभोवऱ्यात असलेले (lalit patil drug case) पुण्यातील ससून रुग्णालयाचे तत्कालीन डीन डॉ. संजीव ठाकूर (Dr. Sanjiv Thakur) यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करून त्यांना अटक करण्याची परवानगी पुणे पोलिसांकडून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला मागण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून तसे पत्र वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर करण्यात आलंय. आता वैद्यकीय शिक्षण विभाग यावर काय अभिप्राय देतो?, यावर डॉक्टर संजीव ठाकूर यांच भवितव्य अवलंबून असणार आहे.
पुणे पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत डॉ. ठाकूर हे दोषी आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलंय. डॉक्टर ठाकूर यांनी ललित पाटीलवर उपचार करण्याच्या नावाखाली त्याचा ससून रुग्णालयातील मुक्काम जास्तीत जास्त वाढेल यासाठी मदत केल्याच पोलिसांना चौकशीत आढळलं. त्याचबरोबर ललित पाटीलला त्याच्या टोळीसह ससून रुग्णालयातून ड्रग रॅकेट चालवताना अटक केल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी त्याचे पित्ताशयाचे ऑपरेशन करण्याचा निर्णय डॉक्टर संजीव ठाकूर यांनीच घेतल्याच निष्पन्न झालंय. या ऑपरेशनसाठी एक्स रे काढताना ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता.
ललित पाटील पळून गेल्यानंतर या प्रकरणात अनेकांवर संशयाची सुई वळली होती. त्यात महत्वाचं नाव डॉ. संजीव ठाकूर यांचं होतं. हे प्रकरण समोर आल्यानंतर संजीव ठाकूर यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं होतं आणि काही दिवस त्यांनी पुण्याच्या बाहेर असल्याचं माध्यमांना सांगितलं होतं. मात्र ज्यावेळी पुण्याची कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आणि ललित पाटील प्रकरणाची माहिती घेण्यासाठी घेण्यासाठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली होती. त्यानंतर धंगेकरांनी संजीव ठाकूर यांना सगळी माहिती मागितली असता ही माहिती देण्यातदेखीस टाळाटाळ केल्याचं समोर आलं होतं.
याच प्रकरणासंदर्भात संजीव ठाकूर यांची चौकशी केली असता ते दोषी आढळून आले. त्यांनी ललित पाटीलला आश्रय दिल्याचं पोलिसांच्या चौकशीत आढळून आलं. त्यानंतर त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. त्यांच्यासोबतच अनेकांची चोकशी करण्यात आली. या प्रकरणी कारागृहातील कर्मचाऱ्यालादेखील अटक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याने ललित पाटीलला त्यांच्या भावासोबत बोलण्यासाठी मोबाईल फोन दिल्याचं समोर आलं होतं. आता याच प्रकरणाचे पाळेमुळं शोधण्याचा पुणे पोलीस प्रयत्न करत आहे. येत्या काळात त्यांच्यासोबतच अनेक मोठी नावं पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इतर महत्वाची बातमी-