Corona and Remdesivir : सहव्याधी असलेल्या कोरोना रुग्णांना रेमेडिसिविर (Remdesivir)  देण्याचा टास्क फोर्सचा सल्ला कोविड टास्कफोर्सने आज (दि.12) दिला आहे. कोरोना (Corona) बरोबरच शुगर , बीपी अशा सहव्याधी असलेल्या लोकांना रेमेडिसिविर इंजेक्शन उपयुक्त असल्याचे टास्कफोर्सने स्पष्ट केलय. डॉ. रमण गंगाखेडकर (Raman Gangakhedkar) यांच्या अध्यक्षतेखाला शुक्रवारी (दि.12) टास्कफोर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोना बाधितांना कोणते औषधे आणि इंजेक्शन देण्यात यावे? याबाबत मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 


सहव्याधी असणाऱ्या रुग्णांना कोणते उपचार? (Corona and Remdesivir)


सहव्याधी असणाऱ्या कोरोना रुग्णांना 3 पर्याय उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. 1. तीन दिवसांकरिता रेमेडिसिविर (Remdesivir) इंजेक्शन देण्यात यावे. किंवा 2. nirmatrelvir/Ritonavir हे 5 दिवसांकरिता किंवा 3. molnupiravir हे औषध कोरोना बाधितांशी समउपदेशन करुन वापरावे, असा सल्ला कोविड टास्क फोर्सने दिला आहे. 


 कोव्हिड जे.एन 1 ची लक्षणे कोणती?(Corona and Remdesivir)


 कोव्हिड जे.एन 1 लक्षणे ILI किंवा SARI या प्रकारात येऊ शकतात. ILI ची लक्षणे ताप, सर्दी, खोकला आणि फ्ल्यू सारखे लक्षणे आहेत. तर SARI झालेल्या रुग्णांमध्ये ILI लक्षणांसोबत श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे. यांसारखी लक्षणे असतात. SARI झालेल्या रुग्णांना पाच दिवसांसाठी रेमडिसिविर देण्याचा टास्क फोर्सचा सल्ला आहे. 


सरसकट अँटीबायोटिक्स वापरू नये (Corona and Remdesivir)


सर्व रुग्णांना सरसकट ॲंटिबायोटिक्स वापरू नये. मात्र, आवश्यकता असल्यास ॲंटिबायोटिक्सचा वापर करावा, असे टास्क फोर्सने स्पष्ट केले. शिवाय, कोरोनाची साथ सुरुवातीला वाढली तेव्हा कोरोनामुळे मृत्यू झालेला लोकांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत नव्हता. यावर टास्कफोर्सने स्पष्टपणे भाष्य केले आहे. कोव्हिड रुग्णांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना देण्याचे आवाहन टास्क फोर्सच्या अध्यक्षांनी केले आहे. कोरोना रुग्णांच्या सरसकट रक्तचाचण्या करण्यात येऊ नयेत. वैद्यकीय चाचण्यानुसार आवश्यक त्या चाचण्या करव्यात असे टास्क फोर्सने म्हटले आहे. 


डिस्चार्ज देताना आरटीपीसीआर टेस्ट करण्याची गरज नाही 


कोविड रुग्णांची डिस्चार्ज करताना आरटीपीसीआर टेस्ट करण्याची आवश्यकता नाही. जेएन1 व्हेरीयंट हवेतून पसरत असल्याचे या बैठकीतून सांगण्यात आले आहे. खबरदारी म्हणून कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांना चाचणी करण्याचे आवाहन बैठकीतील मार्गदर्शक सूचनांमधून करण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Rheumatoid Arthritis : संधिवातासाठी वय जबाबदार नाही तर, 'या' गोष्टींमुळे वाढतो संधिवाताचा त्रास; वाचा लक्षणं आणि उपचार