पुणे : पुण्यात गणेशोत्सवादरम्यान (Pune ganeshotsav 2023) धक्कादायक घटना समोर आली आहे. विसर्जन हौदाची पाहणी करताना एका आरोग्य कर्मचाऱ्याला वीजेचा जोरादर शॉक (Electric Shock) लागला. यात कर्मचाऱी गंभीर जखमी झाला. वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत असलेल्या विसर्जन हौदाजवळ ही घटना घडली आहे. यात कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय जळाले आहेत. 


सूरज रमेश खुडे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यानाशेजारी गणपती विसर्जन हौदावर काम करत असताना सूरज रमेश खुडे हा कंत्राटी कामगार हातातील वायर फेकत होता. त्यावेळी हाय टेन्शन तारेला या वायरचा स्पर्श झाला. याचवेळी खुडे यांना विजेचा शॉक लागला आणि यात त्यांचे दोन्ही पाय जळले आहेत. त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले.


कामावर असताना अपघात झाला तर कंत्राटदार जबाबदारी घेत नाही. पुणे मनपा कामगार युनियनच्या वतीने कंत्राटी कामगारांना इएसआयसीचे ओळखपत्र देण्यात आलं नाही आहे. अपघात झालेल्या कंत्राटी कामगारांना महापालिकेने मोफत उपाचार करण्याची जबाबदारी घ्यावी, असे निवेदन पालिका आयुक्तांना लेखी दिले आहे. त्यावर आता महापालिका कोणता निर्णय देते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.


विसर्जन करताना काळजी घ्या


गणेश विसर्जन दरम्यान गणेश भक्तांचा उत्साह हा शिगेला पोहचतो. राज्यात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात असतो. त्यामुळे शहरी भागात नाही पण ग्रामीण भागातच अधिकच्या दुर्घटना घडल्याचं दिसून येतं. गणेश भक्तांकडून कित्येक वेळेस नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. तर शहराप्रमाणे पोलिस बंदोबस्तही नसतो. त्यामुळे ग्रामीण भागात गर्दी कमी असूनही अशा दुर्घटना अशा प्रकारच्या घडतातच. सध्या गणेशोत्सवामुळे लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र आपणही काळजी घेण्याची गरज आहे. 


पालघरमध्ये तिघांचा मृत्यू 


दुसरीकडे, काल दीड दिवसांच्या गणपती विसर्जन (Ganesh Visarjan 2023) करताना दोघांचा नाल्यात तर एकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. बुधवारी सायंकाळी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने कोनसई येथील नाल्यात दोघांचा तर गो-हे येथील तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला  होता. जगत नारायण मौर्य (वय 38) सुरज नंदलाल प्रजापती (25) अशी कोनसई येथील नाल्यात तर प्रकाश नारायण ठाकरे ( वय 35) हा गो-हे येथील तलावात बुडून मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आहेत. 


इतर महत्वाची बातम्या


Pune Ganeshotsav : देवेंद्र फडणवीसांचा आज पुण्यात 'मंडळ टू मंडळ' दौरा, दगडूशेठ चरणी होणार लीन