पुणे : गिरीट बापट यांच्या निधनानंतर पुण्यात लोकसभा पोटनिवडणूक होणार (Pune Political news) असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, पोटनिवडणुक (Bypoll elections) होण्याचे कोणतेही चिन्हे अजून दिसत नाही. त्यामुळे आता थेट 2024 मध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच पुण्यातील भाजप (BJP) नेत्यांकडून उमेदवारी दावा करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहे. या बॅनरच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपला भावी खासदार म्हणून संदेश देण्याचे काम जगदीश मुळीक यांनी केले आहे. यातून त्यांचे लोकसभा निवडणुकीची तयारीचे संकेत दिसत आहेत.
आम्हीच निवडून येणार...
पोटनिवडणुक घ्यायची किंवा नाही घ्यायची हा अधिकार फक्त निवडणूक आयोगाचा आहे. निवणुकीच्या बाबतीत सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही. पुण्यात कधीही निवडणूक लागू द्या. आम्हीच निवडून येऊ, असा दावाही मुळीकांनी केला आहे. पुणेकर जनता सुज्ञ आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात आणि महत्वाचं म्हणजे पुण्याच्या विकासासाठी भाजप कायमच प्रयत्नशील असतं, हे पुणेकरांना चांगलं माहित आहे, असंही ते म्हणाले. यापूर्वीही गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर जगदीश मुळीक यांच्या समर्थकांनी मुळीकांचे भावी खासदार म्हणून बॅनर्स लावले होते. संपूर्ण पुण्यात त्यांनी बॅनरबाजी केली होती. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या या बॅनर वर त्यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख केला होता. त्यावेळी देखील त्यांनी खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली होती.
इच्छुकांची रांग
पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्यांची इच्छुकांची रांग लागली आहे. त्यात लोकसभेसाठी गिरीश बापट यांच्या परिवारातून स्वरदा बापट यांचे नाव आगामी उमेदवार म्हणून घेतले जात आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुळकर्णी, माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
इतर महत्वाची बातम्या
Pune Ganeshotsav : देवेंद्र फडणवीसांचा आज पुण्यात 'मंडळ टू मंडळ' दौरा, दगडूशेठ चरणी होणार लीन