Amar Mulchandani ED Raid : सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमरमूल चंदानी यांच्या घरातील ईडीच्या तपासात व्यत्यय आणल्याने आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी  तिघांना बेड्या ठोकल्या केल्या आहेत. या प्रकरणी ईडीने पिंपरी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे.


सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमरमूल चंदानीची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी आले. तेव्हा त्यांच्या तपासात अमरमूल चंदानीच्या दोन्ही भावाने आणि मुलाने सहकार्य केले नाही, उलट पुरावा नष्ट केला. तपासात अडथळे आणल्याचा ठपका ठेवत रात्री पिंपरी पोलिसांनी अमरमूल चंदानीच्या दोन्ही भावाला आणि भावाच्या एका मुलाला अटक केली आहे. अशोक साधुराम मूलचंदानी (वय- 57वर्ष ), मनोहर साधुराम मूलचंदानी (वय- 61वर्ष) सागर मनोहर मूलचंदानी वय- 26 वर्ष, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तसेच आणखी दोन महिलांना नोटीस देऊन सोडण्यात आले. अमर मूलचंदानी हे ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.  रात्री ईडीने चौकशी पूर्ण केल्यावर ही तक्रार दिली होती.


काय आहे प्रकरण?


अमरमूल चंदानी सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन आहेत. पिंपरीतमधील  मिस्त्री पॅलेस या ठिकाणी ते राहतात. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे. याच ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. मूलचंदानी यांच्यासह इतर संचालकांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे 124 कर्जांचं वाटप केल्याचं आणि यातून 400 कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी अमर मूलचंदानी यांच्यासह पाच जणांना अटकही केली होती. काही महिन्यांपूर्वी मूलचंदानी जामिनावर बाहेर आले आणि आज ईडीने छापा टाकला होता. आरबीआयने प्रशासक नेमलेल्या या बँकेत हजारो ठेवीदारांचा कोट्यवधींचा पैसा अडकून आहे. 


जामीनावर बाहेर


सेवा विकास बॅंकेच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात 25 शाखा आहेत. या बॅंकेत ठेवेदारांच्या ठेव्या आहेत. याच बॅंकेवर काही दिवसांपूर्वी रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने प्रशासक नेमलेला होता. त्यामुळे या कारवाईकडे हजारो ठेवेदारांचं लक्ष लागलं आहे आणि ठेवेदारांना मोठा दिलासा मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. अमर मूलचंदानी यांच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यावेळी वकिलांनी विरोध केला. त्यांना जर जामीन मिळाला तर ते मुळ पुरावे नष्ठ करतील. शिवाय हा घोटाळा मोठा आहे. त्यामुळे या घोटाळ्याला कर्जदार आणि बँक व्यवस्थापन जबाबदार आहे, असं कोर्टाने सांगितलं होतं. त्यानंतर मात्र त्यांना जामिनावर सोडलं होतं.