Pune Bypoll Election :   दिल्लीवरून थेट पुण्यात दाखल झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) अचानकपणे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या घरी पोहचले आहेत. त्यांच्या या भेटीमुळे तर्क वितर्कांना उधाण आलेलं आहे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूकीसाठी   (Chinchwad By-Election)   भाजपचा उमेदवार कोण असेल? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. लक्ष्मण जगतापाच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे बंधू शंकर जगताप यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. 


पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे लहान बंधू शंकर जगताप या दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. शिवाय दुसऱ्यांना कोणाला दिली तर ईच्छूकांची यादी मोठी आहे. त्यामुळे सगळ्या नेत्यांचं मन राखणं भाजपला आता गरजेचं आहे. भाजपला ही निवडणूक बिनविरोध करायची असेल तर पत्नी अश्विनी यांना उमेदवारी द्यावी लागणार आहे. त्यामुळे शंकर जगतापांची समजूत काढणं गरजेचं असणार आहे. यावरून जगताप कुटुंबात कोणतेही वाद होऊ नये म्हणून फडणवीस महत्वाची भूमिका बजावायला आले, असावेत अशी दाट शक्यता आहे.


आम्ही कायम पक्षासोबत- शंकर जगताप


दोन दिवसांपूर्वी भाजपने चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत आमदार महेश लांडगे, मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधू शंकर जगताप, पत्नी अश्विनी जगताप उपस्थित होते. त्यावेळी शंकर जगताप यांनी पोटनिवडणूकीसंदर्भात शंकर जगताप यांनी भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते की पक्षाच्या निर्णयासोबत आम्ही आहोत. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर आमचं कुटुंबिय या सगळ्या धक्क्यातून अजून सावरलेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही कार्यक्रमात हजेरी लावत नाही आहोत. या बैठकीला आम्हाला बोलवण्यात आलं असल्याने आम्ही आलो आहोत. जगताप परिवारातील सदस्य म्हणून आम्ही बैठकीला आलो आहो. जगताप कुटुंबातील कोणाला उमेदवारी द्या, असं आमचं म्हणणं नाही आहे. आम्ही पक्षासोबत एकनिष्ठ आहोत. त्यामुळे ज्यांना कोणाला उमेदवारी मिळेल त्यांच्या आम्ही सोबत आहोत. पक्षाचा निर्णय अंतिम असेल असंही ते म्हणाले होते. 


देवेंद्र फडणवीस दिल्लीतून थेट पुण्यात


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीहून थेट पुण्यात आले आहेत. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार घोषित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही मतदार संघासासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून उमेदवारी कोणाला मिळणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


संबंधित बातमी-


Pune By-election : कसबा, चिंचवड मतदार संघातून भाजपचा उमेदवार ठरला, घोषणा कधी? चंद्रकांत पाटील यांनी दिली महत्त्वाची माहिती