Maharashtra Government : जानेवारी महिन्यात राज्य सरकारने मद्यविक्री करणाऱ्या परवाना धारकांना मोठा झटका दिला होता. मद्य विक्रेत्याच्या परवाना शुल्कात 15 ते 100 टक्के वाढ करून राज्य सरकारने विक्रेत्यांना मोठा झटका दिला होता.  त्यानंतर मद्य विक्रेता संघटनांनी या वाढीव परवाना शुल्क वाढ केल्याने मद्याविक्रेत्यांनी सरकारला न्यायालयात खेचण्याची धमकी दिली होती. आधीच कोरोनामुळे सगळे वाईनबार हे मोठ्या अडचणीत आले आहेत. अनेक जण तर कर्जबाजारी झाले आहे. त्यामुळे हा विरोध पाहून अखेर उत्पादनशुल्क मंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक करून वाढलेले दर विक्रेत्यांना न परवडणारे असल्याचं सांगत वाढीव दर कमी करा असा एकसुर नंतर राज्य सरकारने मद्य विक्रेत्याच वाढीवमध्ये सुधारणा करून दर कमी केले आहेत. आता परवाना शुल्कमध्ये सरसगट 10 टक्के वाढ केल्याचं राजपत्र द्वारे राज्यातील उत्पादन शुल्क विभागाला या बाबत कळवलं आहे. त्यामुळे मद्य विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे..


मात्र नुतनीकरण करतांना जनगणना झाल्यानंतर वाढीव दरासाठी विक्रेत्यांना वाढीव परवाना शुल्क भरावा लागणार आहे. करार पत्रक लिहून घेत ही दरवाढ कमी केल्याच विक्रेत्यांकडून समजतंय सध्या 2010 च्या जणगणने नुसार परवाना नूतनीकरण केल्या जातंय. त्यामुळे येत्या काळात आता कीती दर वाढ होईल ते जनगणनेनंतर कळेल. मात्र, तूर्तास विक्रेत्याना दिलासा मिळाला हे मात्र खरं...


 BR II  म्हणजे बियर शॉप 


  लोकसंख्या          रुपये


5000ते 50000=21,800


50000ते 1लाख=32,600


1लाख ते 2,50000=65,200


2,50000ते 5 लाख=108700


5 लाख ते 10 लाख=173800


10लाख ते 20 लाख=239100


FL III बियर बार


लोकसंख्या       रुपये


5000 ते 50000=62,200


50000 ते 1लाख=93,200


1 लाख ते 2,50000=186300


2,50000ते 5 लाख=310500


5 लाख ते 10 लाख=496700


10 लाख ते 20 लाख=683000


FL II वाईन शॉप 


लोक संख्या          रुपये


5000ते 50000=193400


50000ते 1लाख=307800


1लाख ते 2,50000=465500


2,50000ते 5 लाख=652200


5 लाख ते 10 लाख=809900


10 ते 20 लाख=1083200


CL III देशी दारू किरकोळ विक्रेता


लोक संख्या          रुपये


5000ते 50000=44500


50000ते 1लाख=76200


1लाख ते 2,50000=190600


2,50000ते 5 लाख=317000


5 लाख ते 10 लाख=444700


10लाख ते 20 लाख=571700