पुणे: आळंदीच्या इंद्रायणीत आज पुन्हा एक महिलेने उडी घेतली आहे. सकाळच्या सुमारास एका व्यक्तीने त्या महिलेस रोखण्याचा ही प्रयत्न केला होता, त्याच व्यक्तीने आळंदी पोलिसांना याची खबर दिली. पीएमपीएमएल बस स्टॉप लगतच्या पुलावरून महिलेने जीव देण्याच्या उद्देशाने उडी घेतलेली आहे. मात्र ही महिला कोण आणि तिने असं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप ही माहिती समोर आलेली नाही. रविवारी गरुड स्तंभावरून महिला पोलीसाने उडी घेत आत्महत्या केली होती. तीन दिवसांच्या शोधकार्यानंतर तिचा मृतदेह काल आढळला त्यानंतर आज पुन्हा ही घटना उघडकीस आली आहे. या महिलेचं शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. (Another woman ended her life by jumping into Indrayani river Search operation continues Police investigating)
या घटनेबाबत स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज (गुरुवारी) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलाशेजारील नव्याने उभारण्यात आलेल्या स्कायवॉक पुलावरून एका महिलेने नदीपात्रात उडी मारली. या घटनेची माहिती तातडीने आळंदी पोलीसांना देण्यात आली, त्यानंतर आळंदी अग्निशमन विभाग पथकाकडून इंद्रायणी नदीत या महिलेचा शोध सुरु आहे. इंद्रायणी नदीला पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे नवीन पुलाच्या खालच्या बाजूला तसेच अन्य ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे. मात्र अद्याप नदीत उडी मारलेल्या महिलेचे नाव तसेच कारण समजले नाही. आळंदी पोलीस याचा तपास करत आहे.
महिला वाहून जातानाचा व्हिडिओ आला समोर
अखेर महिला पोलिसाचा मृतदेह आढळला
पुणे पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या वीस वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल अनुष्का केदारचा मृतदेह तीन दिवसांनी आढळला आहे. रविवारी सायंकाळी आळंदीच्या इंद्रायणी नदीमध्ये तिने उडी घेतली होती. वैयक्तिक कारणातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले होते, मात्र अद्याप ते कारण समोर आलेलं नाही. उडी घेतली त्याचवेळी एका तरुणाने तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न ही केले होते, मात्र तो अपयशी ठरला होता. आज अखेर तिचा मृतदेह आळंदीतून पुढे पंधरा किलोमीटर अंतरावर आढळला आहे. या घटनेने पुणे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जातीय. अनुष्का पुणे ग्रामीण पोलीस दलातील मुख्यालयात कार्यरत होत्या. दोन दिवसांच्या सुट्टीवर असताना शेवटचा फोन मित्राला करत, आपण आत्महत्या करत असल्याचं अनुष्कानं कळवलं होतं. त्याचनुषंगाने आळंदी पोलीस तपास करत आहेत.
नदीत उडी मारण्यापूर्वी अनुष्का केदार यांनी देहूफाटा आळंदी येथे राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राला फोन केला होता. मी इंद्रायणी नदीत उडी मारणार असल्याचे त्यांनी फोनवर म्हटले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या मित्राला बोलावून घेत त्याची चौकशी सुरु केली.