पुणे: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. जयदीप आपटे हा अनुभव नसलेला मूर्तीकार होता. तरीही त्याला शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम कसे देण्यात आले? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्या प्रकरणी आज शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, समितीने पुतळा पाहिला होता का, समितीने पुतळ्याला हिरवा कंदील दाखवला होता, का? समितीने जर हिरवा कंदील दिला होता तर कोण ते विद्वान होते ज्याला पुतळ्याचं शरीर सौष्ठव कळलं नाही आणि जर त्यांनी तो हिरवा कंदील दिला नसेल, जर परवानगी दिली नसेल तर तो पुतळा उभा का केला असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
त्याचबरोबर ज्या आपटेबाबत बोललं जातं तो आपटे तो सनातन प्रभातशी संबध आहे, या माणसाची मुलाखत ही यामध्ये दिलं आहे, जो माणूस दीड फुटाचा पुतळा उभा करू शकतो त्याला इतकं मोठं काम कसं दिलं. त्याचं काम दिड फुटापेक्षा कमी उंचीचे पुतळे उभे करमं होतं त्याला इतकं मोठं काम कसं दिलं गेलं, का दिलं याच्या खोलात गेलो तेव्हा समजतं हा जयदीप आपटे सोबत नितेश राणे दिसत आहेत. जयदीप आपटे आणि नितेश राणे यांचा कोणता दोस्ताना घरी कोण नसताना आहे, हे सांगितलं गेलं पाहिजे. आपटे आणि नितेश राणे यांची दोस्ती असल्यानेच सिंधुदुर्गातील मालवण मध्ये पुतळा उभा करायचा आहे, जिथे निलेश राणे आपल्या बापाचा माल असल्यासारखे वागत आहेत तिथे जयदीप आपटेला बोलावलं जातं. काय संदर्भ आहे, ये रिश्ता क्या कहलाता हैं यांच्यावर उत्तर फडणवीसांनी द्यायला पाहिजे असंही अंधारेंनी म्हटलं आहे.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी पत्र लिहून सांगितलं होतं
छत्रपती शिवरायांचा पुतळा खाली आला खरंतर यावर अजूनही आमची अपेक्षा होती की, राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपाची एक महत्त्वाचं नाव म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्यावतीने मोदी सरकारच्यावतीने एक पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांनी जे प्रश्न उपस्थित केले, इतिहास संशोधकांनी जे प्रश्न उपस्थित केलेत नागरिकांच्या मनातले जे संतप्त सवाल आहेत त्यांचं उत्तर देणे अपेक्षित होतं. परंतु, तसं उत्तर देणं त्यांनी टाळलेलं आहे. जेव्हा मुळात हा पुतळा उभा केला होता तेव्हाच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी 4 डिसेंबर 2022 ला पत्र लिहून कळवले होते की सदरील जो पुतळा आहे याचे एकूण शरीर सौष्ठव वेगळे आहे. एकूण कलाकृती बघता कुठलाही पुतळा उभा करायचा असेल तर पुतळा उभा करण्याच्या आधी कला संचलनालयाच्या अधिपत्याखाली एका समितीला ते तपासणी करते, पाहणी करते. ते झालं होतं का? त्या समितीने त्याला परवानगी दिली होती का, समितीने जर हिरवा कंदील दिला होता तर कोण ते विद्वान होते ज्याला पुतळ्याचं शरीर सौष्ठव कळलं नाही आणि जर त्यांनी तो हिरवा कंदील दिला नसेल, जर परवानगी दिली नसेल तर तो पुतळा उभा का केला असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
छत्रपती संभाजी राजे यांनी मोदींना या पुतळ्याच्या शरीरसौष्ठवाबाबत पत्र लिहलं होतं
छत्रपती संभाजी राजे यांनी सुद्धा या संदर्भाने 12 डिसेंबर 2023 ला पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवलं होतं की सदरील पुतळा हा नीट दिसत नाही. हा पुतळा महाराजांच्या शरीरसौष्ठवासारखा दिसत नाही. त्यामुळे यावर काय ते तात्काळ आपण उत्तर देणे भाग आहे. पण तेव्हा सुद्धा यावर उत्तर दिलं गेलं नाही. या सगळ्या संदर्भाने या पुतळ्यामध्ये जाणीवपूर्वक महाराजांची विकृती करण्याचा प्रयत्न ज्या आपटेने केला हे फार विशेष आहे की, बदलापूर प्रकरणातही आपटे आहे, आणि इकडच्याही प्रकरणात आपटे आहे. या दोनही आपट्यांना जर देवेंद्र फडणवीस पाठीशी घालणार असतील तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाची सत्ता कशी अपटायची हे महाराष्ट्राच्या जनतेला चांगलं कळतं, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
जयदीप आपटे आणि नितेश राणे यांचा दोस्ताना असल्याने....
ज्या आपटे संदर्भाने बोललं जातं, तो आपटे हा सनातन प्रभातची कसा संबंधित आहे, आणि सनातन प्रभातची याचे काय नाते आहे हे स्पष्टपणे दिसतं कारण या माणसाची मुलाखत याचं वय किती यावर मला जायचं नाही, कारण लहान वयातही माणसं मोठी काम करू शकतात हा आम्हाला संत ज्ञानेश्वर माऊलींचा वारसा सांगतो त्यामुळे मला वयावर टिप्पणी करायची नाही पण जो माणूस दीड फुटाचा सुद्धा पुतळा उभा करू शकत नाही ज्याचं काम दीड फुटापेक्षा कमी पुतळे उभे करण्याचं होतं. अशा माणसाला एवढं मोठं काम का दिलं गेलं याच्या जेव्हा आम्ही खोलात जातो, तेव्हा असं लक्षात येतं की हा माणूस म्हणजे कोण आहे तर हा जयदीप आपटे सोबत सोबत नितेश राणे दिसत आहेत, नितेश राणे चा आणि जयदीप आपटेचा काय संबंध ते सांगितलं गेलं पाहिजे. जयदीप आपटे आणि नितेश राणे यांची दोस्ती कदाचित त्यामुळेच सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये पुतळा उभा करायचा आहे, तिकडे नितेश राणे आपल्या बापाचा माल असल्यासारखे वाटत आहेत, तिथे जयदीप आपटेला बोलावलं जातं हा काय संदर्भ आहे ये रिश्ता क्या कहलाता है याच्यावर उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवे असंही अंधारांनी म्हटलं आहे.
या पुतळ्याच्या संबंधाने याचा विकृतीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाने आणि विकृत जे सगळे मनोगती आणि विकृत सनात आमचे लोक आहेत. त्यांनी काय पद्धतीने केला त्याच्या काही जर सोशल मीडियावरच्या जर पोस्ट बघितल्या स्पष्ट पुतळा जयदीप आपटे आणि नितेश राणे पुन्हा जयदीप आपटे आणि नितेश राणे एकत्रित फोटो आहे या दोघांचे चांगले संबध होते म्हणून काम दिलं होतं का? आणि म्हणून याला काम दिलं होतं का? एका अनुनववी अजिबात अनुभव नसलेल्या माणसाला महाराष्ट्राचा आराध्य असणाऱ्या शिवछत्रपतींचा पुतळा उभा करण्याचा काम कसं काय दिलं जाऊ शकत, मी पुतळा उभा करणारे आणि ज्येष्ठ शिल्पकार असणाऱ्या भगवान रामपुरेचे यांना विचारलं की, मुख्यमंत्री महोदय म्हणतात की ताशी 45 किलोमीटर वेगाने वारं वाहत होतं, म्हणून पुतळा मोडकळीस आला. मुळात 645 किलोमीटरने वार काय मालवणमध्ये पहिल्यांदाच वाहत होता का? मी जरा आठवण करून दिली पाहिजे हा तमिळनाडू मधला पुतळा आहे. हे ज्येष्ठ कवी आणि तत्त्वज्ञान तिरुवल्लुवर यांचा पुतळा आहे. हा पुतळा 130 फुटांचा आहे. हा समुद्रात आहे. हा 100 वर्ष होत आली आहेत आणि या पुतळ्याला अजून कुठेही डंख नाही हा पुतळा अजूनही मजबुतीने उभा आहे समुद्रातला १३० कोटी पुतळा हा अजूनही इथे ताकदीने उभा आहे आणि महाराष्ट्रात मात्र ज्यांना नौदल म्हणजे फादर ऑफ नौसेना असं म्हणून त्यांना ओळखलं जातंय, त्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या बद्दल इतकी हलगर्जी का केली याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवं ते अजूनही आम्हाला दिलेलं नाही, असं म्हणत अंधारेंनी फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
या पुतळ्याला जाणीवपूर्वक विकृत बनवण्याचा प्रयत्न ज्या लोकांनी केला आणि मुळात जो जयदीप आपटे आहे हा जयदीप आपटे काय माणूस आहे त्याचे काही हे फुटेज आहेत की त्याने कुठली कुठली फुटेज आहेत, हा संभाजी भिडे सनातन प्रभात नथुराम गोडसे एक संपूर्ण सत्य वगैरे सारख्या सगळ्या हिंसक पेजला अपिलेटर असणारा माणूस आहे. त्याचं काय करणार आहात ते सांगा. अशाच पद्धतीने अजून एक मोठा पुतळा आहे जो पुतळा एकदम हे म्हणजे आपल्याकडे पुतळे चिक्कार उभे राहिले पण त्या सुरक्षेचा विचार केला गेला पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
कपाळावरची ती खुन का दाखवली?
हे आवर्जून सांगायला हवे की पुतळ्याच्या कुठल्याच महाराजांच्या पुतळ्याच्या कपाळावरची जखमेची खून दाखवलेली नाही. आपटेने जाणीवपूर्वक जखमेवरची ती कपाळावरची जखम का दाखवली आपल्याला नेमकं काय सांगायचं होतं, आपटेला शिवछत्रपतींचा आव्हान करायचा होता का आपटेने याचं स्पष्टीकरण आणि सरकारने सुद्धा याचं स्पष्टीकरण का मागितलं नाही, देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची अशी इच्छा आहे का की छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर ही आमची अस्मिता आहे आमची वैचारिक धरोहर आहे, ही सगळी वैचारिक धरोहर नामशेष करत काय तुम्हाला गोळवळकर आणि हेडगेवार स्थापित करायचे आहेत. का गोळवळकर आणि हेडगेवार यांना स्थापित करण्यासाठी हे सगळं नाटक चाललेला आहे का हे एकदा त्यांनी सांगितलं पाहिजे असंही अंधारेंनी म्हटलं आहे.
काल देवेंद्र फडणवीस यांना विचारलं गेलं की, अहो राणे काय बोलतायत जरा बघा राणे काय म्हणतायेत त्यावर ते असं म्हणाले की, जेवढे मी त्यांना ओळखतो त्यानुसार त्यांचा तो अजिबात स्वभाव नाही. ते अशा पद्धतीने कधीही, कुठेही धमकी वजा बोलू शकत नाहीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं कौतुक त्यांची स्मरणशक्ती हल्ली कमी झाली आहे. मी त्यांना बहिण म्हणून काळजीने एक दोन किलो बदाम पाठवेल कारण अजित दादा बद्दलही चक्की पीसिंग वगैरे डायलॉग केले आणि नंतर त्यांच्यासोबत पाठव लव मॅरेज झालं ज्या देवेंद्र फडणवीस यांनी काल राण्यांचं कौतुक केले आहे त्या देवेंद्र फडणवीस यांना हे कुणीतरी सांगायची गरज आहे. यावेळी त्यांनी फडणवीसांचा एक व्हिडिओ देखील दाखवला आहे. सभागृहाच्या पटलावरही फडणवीसांनी देखील कौतुक केल्याचं म्हणत अधारेंनी हल्लाबोल केला आहे. भाजप गुंडांचा पक्ष आहे फडणवीस आणि राणेंवरचे सगळे गुन्हे पाठवायचे आणि ते फडणवीस काल कौतुक करतात, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
नारायण राव तुमचा इतिहास आम्हाला चांगला माहिती आहे. तुमचा इतिहास पोल्ट्री फार्म पासूनचा आम्हाला माहिती आहे. तुमचा इतिहास आम्हाला तिथंपासून माहिती आहे 1990 ला जी कणकवली कधीकाळी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या समाजवादी विचारांनी भारावलेली होती. त्या कणकवलीला गुन्हेगाराचा आखाडा करणे हे तुम्ही केलं राणे साहेब तुमचा इतिहास मला इतका पक्का माहिती आहे की 1990 ला श्रीधर नाईकांची जी हत्या झाली त्या श्रीधर नाईकांच्या हत्येचे तुम्ही मुख्य आरोपी होतात तुमच्यावर खटला चालवला गेलाय, तुमचा इतिहास इतका मोठा आहे की 2002 ला सत्यजित भिसेचे जी कणकवलीत हत्या झाली त्याचाही आरोप तुमच्यावर होता. यावर देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या पटलावर बोलले आणि न्यायालयाचे खटला चाललाय. 2009 ला राणेजी तुमचे स्वतःचे सख्खे चुलत भाऊ अंकुश राणे यांचा मृतदेह हा सिंधुदुर्गाला अत्यंत विकृत अवस्थेत मिळाला होता. हा तुमचा इतिहास आहे. तुमच्या इतिहास हा आहे की, मुलुंडचा एचडी व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या याने अविघ्न पार्क मधला जो सगळा घोटाळा आहे तो घोटाळा काढून तुमच्या मागे घेणे लावली, नारायण राणे तुमचा इतिहास आम्हाला इतका माहिती आहे की, ज्या राहुल गांधीजींची तुम्ही आता जात काढताय त्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राहुलजी यांच्या आई सोनिया गांधी यांच्या पायावर उचले आणि मुजरे करायला तुम्ही सातत्याने दिल्लीच्या वाऱ्या करत होता हा तुमचा इतिहास मला माहित आहे.
तुम्हाला जेवणाच्या ताटावरून अटक करावी लागली कारण...
तुमचा इतिहास हा आहे की, तुम्हाला जेवणाच्या ताटावरून अटक करावी लागली. का कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या सत्यजित भिसे असेल श्रीधर नाईक असेल अंकुश राणे असतील अशा अनेकांना भरल्या ताटावरून उठवलेलं आहे. तुमचा इतिहास इतका मोठा आहे नारायण राणे की तुम्हाला भुंकल्याशिवाय कुठेही किंमत नाही नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे तुम्हाला फक्त आणि फक्त ओरडण्यासाठीच देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे की तुमची एकूण पार्श्वभूमी आहे. या सगळ्यांवर आम्हाला आता प्रश्न फक्त आणि फक्त देवेंद्रजींना विचारायचं असं म्हणत त्यांनी राणंना डिवचलं आहे.
तुमचा इतिहास हा संस्कार नसलेल्या कुटुंबाचा इतिहास...
त्यावर नितेश राणे म्हणतोय की आमचा बाप सागर बंगल्यावर आहे. पोलिसांच्या आशा बदल्या करेल की त्या बदल्या तुम्हाला बायकोला फोन लागणार नाही. पोलिसांना व्हिडिओ रेकॉर्ड करता का म्हणून धमकावतो कालच्या फुटेजमध्ये निलेश राणे पोलिसांना धक्काबुक्की करताना दिसत आहे. कालच्या फुटेजमध्ये महिला पत्रकारांच्या आंचटीला येतानाचे प्रयत्न दिसत आहेत. कालच्याच फुटेजमध्ये एबीपी माझाचा बूम ओढायचा प्रयत्न झाला पुढारीच्या पत्रकाराला दमदाट्याची भाषा झाली इथे पुण्यामधला एका महिला पत्रकाराला काय पद्धतीने नितेश राणेने भाषा वापरली तोही इतिहास माहिती आहे.
तुमचा इतिहास हा संस्कार नसलेल्या कुटुंबाचा इतिहास आहे आणि अशा संस्कार नसलेल्या कुटुंबाबद्दल काय भूमिका घ्यायची हे आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं लागेल. देवेंद्र फडणवीस जर आज तुम्ही नितेश राणे नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करणार नसाल, त्या दिवशी एका लाईव्ह डिबेटमध्ये विलास बडेंनी प्रश्न विचारल्यावर नितेश राणे थेट विलास बडे यांना सुद्धा धमकावण्याच्या सुरात बोलत होते की, विलास तुम्ही हिंदू नाहीत का? इतकr मुजोर भाषा ज्या नेत्यांची राणी आणि निलेश राणेंची आहे तो मुजोरपणा देवेंद्रजी तुमच्यावर वरदहस्ता शिवाय शक्य नाही तुमच्या वरदहस्त काय सांगतो हे आम्हाला एका स्पष्ट करा तुम्हाला यांच्यावर जर गुन्हे दाखल करायचे नसतील तर महाराष्ट्र हे स्पष्टपणे समजून घेईल की देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाही, तुम्हाला राज्यातील लेकीबाळी सुरक्षित ठेवायच्या नाहीतस, असं म्हणत अंधारेंनी फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.