एक्स्प्लोर

Pune News: इंम्पॅक्ट... रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत पुणे पालिका अॅक्शन मोडवर; एका दिवसात बुजवले 139 खड्डे

खड्ड्यांच्या तक्रारींसाठी पुणे महापालिकेने (पीएमसी) आणखी दोन हेल्पलाइन क्रमांक सुरू केल्या आहेत. नागरिकांनी 020-25501083 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Pune News: पुणे (Pune) शहरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुन्हा चांगलाच जोर धरला. त्यानंतर पालिका प्रशासन तातडीने अॅक्शन मोडमध्ये आले आणि दिवसभरात 139 ठिकाणी खड्डे (Potholes) बुजवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. सध्या सगळ्या शहरात नागरिक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रस्त होते.  शहरातील खड्ड्यांच्या तक्रारींसाठी पुणे महापालिकेने (पीएमसी) आणखी दोन हेल्पलाइन क्रमांक सुरू केल्या आहेत. 020-25501083 सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 दरम्यान नागरिकांनी या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून शहरात सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अनेक चौक, तसेच मुख्य रस्त्यांवर ड्रेनेजची व्यवस्था नाही. त्यामुळे अनेक मुख्य चौकात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक रस्त्यांवर पावसाळ्यापूर्वी केलेली कामे खराब झाली आहेत. शहरातील समान पाणी योजना व मलनि:सारण वाहिन्यांची कामे झाल्यानंतर या रस्त्यांचे काम सुरू असतानाही खड्डे नीट दुरुस्त करण्यात आलेले नाहीत, परिणामी अनेक भागात चेंबर्स कोसळले आहेत.

त्याचा थेट परिणाम शहरातील वाहतुकीवर झाला असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, शहरात सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम महापालिकेला करता आले नाही. मात्र, गुरुवारी (14 जुलै) पाऊस ओसरताच महापालिकेने सकाळपासूनच रस्त्याचे काम सुरू केले. प्रशासनाने केलेल्या पाहणीत तब्बल 234 खड्डे आढळून आले. आज 139 खड्डे दुरुस्त करण्यात आले आहेत. 18 ठिकाणी कोसळलेले चेंबर उचलण्यात आले असून 14 ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या रस्ते विभागाने दिली.

शहरातील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी नागरिकांना आता महापालिकेने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधता येईल; 020-25501083 सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 दरम्यान. याशिवाय नागरिक 9049271003 या क्रमांकावर 24 तास तक्रार करू शकतात.त्यामुळे नागरिकांनी या दोन्ही क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाच्या रस्ते विभागाने केले आहे.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

युद्धात जिंकलो आणि तहात हरलो, MPSC आंदोलनातून हाती काहीच पडलं नाही, सुषमा अंधारेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, मंत्री शिवेंद्रराजे आणि रोहित पवारांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
युद्धात जिंकलो आणि तहात हरलो, MPSC आंदोलनातून हाती काहीच पडलं नाही, सुषमा अंधारेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, मंत्री शिवेंद्रराजे आणि रोहित पवारांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याचा निकाल हाती, पहिल्या फेरीत सुनेत्रा पवारांचं पॅनल आघाडीवर; 21 जागांपैकी किती सीटवर आघाडी?
सोमेश्वर कारखान्याचा निकाल हाती, पहिल्या फेरीत सुनेत्रा पवारांचं पॅनल आघाडीवर; 21 जागांपैकी किती सीटवर आघाडी?
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांचा इशारा
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
Embed widget