लॉकडाऊनमुळे राजस्थान मधील कोटात अडकलेले महाराष्ट्राचे विद्यार्थी मायभूमीत दाखल
या विद्यार्थ्यांनी एबीपी माझाकडे त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या आहेत. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, सध्या सगळे पैसे संपले आहेत. अन्नधान्य, गॅस पण संपले आहे. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी हे आता खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडले आहेत. ह्या विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाकडून कसलीही व्यवस्था करण्यात आलेले नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
लॉकडाऊन 3.0 | वाढीव कालावधीसाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, सोलापूर नागपूर आदी) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत. असे अधिकार असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.
वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सोलापुरात विद्यार्थ्यांची गर्दी
आपल्या गावी परतण्यासाठी अनेक जण काल पासून वेगवेगळ्या कार्यालयासमोर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. काल माहिती मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर आज वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रुग्णालयात समोर लोक जमताना पाहायला मिळत आहेत. सोलापुरातील शासकीय संसर्गजन्य रुग्ण असलेल्या हॉस्पिटलसमोर मोठी रांग पाहायला मिळत आहे. दुसऱ्या राज्यात तसेच राज्यांतर्गत प्रवास करण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्यामुळे अनेक मजूर, विद्यार्थी तसेच सोलापूरात अडकून राहिलेल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. यातील अनेक जण अगदी सकाळपासून पायपीट करत हॉस्पिटलपर्यंत पोहोचले आहेत. मात्र वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठी रांग असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या