आता मातोश्रीबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक काम करणाऱ्या तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने कोरोना मुख्यमंत्र्यांच्या दारावर गेल्याचे पहायला मिळत आहे. यापूर्वी मातोश्री परिसरातील चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाची माहिती मिळताच संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. मातोश्रीच्या काही मीटर अंतरावर असणाऱ्या एका चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या संपर्कातील तब्बल 130 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले होते. हे सर्व पोलीस विविध शिफ्टमध्ये मातोश्रीवर ड्युटीसाठी होते. दरम्यान, मातोश्रीवरील चहावाला कोरोनावर मात करुन नुकताच परतला आहे. मात्र आता ‘मातोश्री’बाहेर बंदोबस्ताला असलेल्या आणखी तीन पोलिसांना बाधा झाल्याने, रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
लॉकडाऊनमधलं आगळं वेगळं लग्न, पुणे पोलिसांनी केलं कन्यादान
पोलिसांना 50 लाखांचं कवच
राज्यात आतापर्यंत 300 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, तीन पोलिसांचा यामुळे मृत्यू देखील झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. राज्यातील पोलीस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
Rajesh Tope | मोफत, कॅशलेस विमा संरक्षण देणारं एकमेव राज्य : राजेश टोपे