एक्स्प्लोर

मोदींआधीच काँग्रेसकडून पुणे मेट्रोचं भूमिपूजन संपन्न!

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अगोदर काँग्रेसने पुणे मेट्रोचं भूमिपूजन आटोपलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. दुसरकीडे उद्या भाजप-राष्ट्रवादीतर्फे पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचा नारळ वाढवला जाणार आहे. पुण्यात स्वारगेट येथे काँग्रेसकडून 23 डिसेंबरलाच मेट्रोचं भूमिपूजन करण्यात येईल, असं पुण्याचे काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितलं होतं. पुणे मेट्रोला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मान्यता मिळाली होती. पुण्यात मेट्रो आणण्याच्या निर्णयात त्यांचा महत्वाचा वाटा आहे, असा दावा रमेश बागवे यांनी केला. आधी नागपूर मेट्रोचं भूमिपूजन का? दरम्यान, भाजपनं पुणे मेट्रोआधी नागपूर मेट्रोचं भूमिपूजन का केलं असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी विचारला आहे. शनिवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं भूमीपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मात्र महापालिकेनं पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्याचं ठरवलं असताना मोदींच्या हस्ते उद्घाटन का, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आहे. पुणे मेट्रोचं भूमिपूजन शरद पवारांच्या हस्ते व्हावं, असा ठराव महापालिकेत काँग्रेसच्या पाठिंब्यानेच मंजूर करण्यात आला होता. मात्र पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी भाजपसोबत दिलजमाई केली. या निर्णयावरुन यू टर्न घेत शरद पवार केवळ कार्यक्रमाला उपस्थित असतील, यावरच सहमती दर्शवली, असा आरोप रमेश बागवे यांनी केला आहे. भाजप-राष्ट्रवादीचा वाद पुणे मेट्रो भूमिपूजनवरुन राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद सध्या निवळला आहे. 24 डिसेंबरला होणाऱ्या मेट्रोच्या भूमीपूजन कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रवादीने एक पाऊल मागे घेतलं. त्यामुळे 23 डिसेंबरचा पुणे मेट्रो भूमिपूजनाचा प्रस्तावित कार्यक्रम रद्द करत असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. शरद पवारांना 24 तारखेच्या कार्यक्रमाला न बोलावल्यास राष्ट्रवादी काँग्रेस 23 तारखेला संध्याकाळी मेट्रोचं भूमिपूजन करणार, असा इशाराही पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी दिला होता.

संबंधित बातम्या :

पुणे मेट्रोचं भूमीपूजन पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते करणार : काँग्रेस

पुणे मेट्रोचं मोदींच्या दौऱ्यापूर्वीच भूमीपूजन करणार, राष्ट्रवादीचा इशारा

पवार-मोदी 24 डिसेंबरला व्यासपीठावर एकत्र येणार!

महत्त्वाच्या बातम्या

पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
मावळात भाजपचे तीन गट, मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढायचा आणि काही नाही मिळालं की आंदोलन करायचं, राष्ट्रवादीच्या आमदाराने उडवली खिल्ली
मावळात भाजपचे तीन गट, मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढायचा आणि काही नाही मिळालं की आंदोलन करायचं, राष्ट्रवादीच्या आमदाराने उडवली खिल्ली

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Embed widget