Pune News: पुणे : दुकानं आणि अस्थापनांवरली मराठी पाट्यांसाठी मुंबई, ठाण्यानंतर आता पुण्यात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील पाट्या मराठीत लिहिल्यामुळे मनसेने आंदोलन केलं आहे. मनसेचे कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी जंगली महाराज रस्त्यावरील दुकानांची नावं इंग्रजीत लिहून असलेल्या पाट्या फोडल्या आहेत. मनसेचे शहराध्यक्षांसोबतच मनसेचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. महापालिकेने दुकांच्या पाट्या बदलण्याचे आदेश दिले आहेत तरीही नावं बदलण्यात न आल्याने होर्गिंग्सची तोडफोड केली आहे.
मागील दोन महिन्यांपासून या सगळ्या दुकानांना पाट्या बदलवण्यासाठी वेळ दिला होता. मात्र अजूनही या पाट्या दुकानदारांनी बदलल्या नाही आहेत. या दुकानदारांची अरेरावी खपवून घेतली जाणार नाही. त्याचं नुकसान झालं तरीही आणि आज इंग्रजीत लिहून असलेल्या पाट्या फोडणार असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष बाबू वागस्कर, अभिनेते रमेश परदेसीदेखील उपस्थित होते.
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर मोठ्या मोठ्या ब्रॅन्ड्सची दुकानं आहेत. त्यांची नावं इंग्रजीमध्ये लिहिण्यात आली आहे. महापालिकेने मराठी पाट्यांसदर्भात आदेश दिले होते. दुकानांना मराठी पाट्या लावा नाहीतर कारवाई करु, असा इशारा महापालिकेने आदेशात दिले आहेत. मात्र त्यापूर्वीच मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
महापालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष
सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांत सर्व पाट्या दुकानदारांनी मराठी स्थानिक भाषेत करावेत, असे आदेश दिले होते. त्याची मुदत 25 नोव्हेंबर रोजी संपली. त्यानंतर मुंबईतील अनेक परिसरातील इंग्रजी पाट्या हटवून मराठी पाट्या लावण्यात आल्या. त्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत सगळ्यांना आवाहन केलं. त्यानंतर ज्या ठिकाणी इंग्रजी पाट्या दिसल्या त्याठिकाणी आंदोलन केलं होतं. हेच पाहून मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यातीलही दुकाने आणि अस्थापनांच्या पाट्या मराठीमध्ये करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांकडे केली होती. तसेच, न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याच मागणीला आता यश आलं आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने मराठी पाट्या संदर्भातले आदेश काढले आहे. या संदर्भातील सगळी माहिती प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला आदेशाची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे. आणि अंमलबजावणी न करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा ईशारा दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
अजितदादा स्वार्थासाठी नाही तर विकासासाठी सत्तेत, कर्जतमधील शिबिरात छगन भुजबळांचा दावा