एक्स्प्लोर

Maratha Reservation : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, गणपतीच्या दर्शनाला आले असता मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता असून ठिकठिकाणी आंदोलक आक्रमक झाले आहेत. 

पुणे : एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत तर दुसरीकडे राज्यभर मराठा आंदोलनक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. पुण्यात मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच घेराव घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी आले असला मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांनी केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी गणेशाचं दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी मराठा आंदोलकांनी या ठिकाणी जात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्नही यावेळी करण्यात आला. 

पोलिसांनी हस्तक्षेप करत मराठा आंदोलकांना सुरुवाताली समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांची घोषणाबाजी सुरूच असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. 

जरांगेंची तब्येत ढासळली

मराठा आरक्षणाच्या लढ्याची धग मुंबईच्या दिशेने वाढत आहे, पण या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचंच शरीर आता होरपळून निघत आहे. 19 दिवसांचं उपोषण... हजारोंचा जनसमुदाय... आणि आरक्षणासाठी मुंबई गाठण्याचा निर्धार... पण पाटोद्यात पोहोचलेल्या जरांगेंची प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांनी तपासणी केली, सलाईन लावलं. वडिलांच्या डोळ्यात अश्रू आहेत. पण जरांगेंचा मुंबई गाठण्याचा निर्धार मात्र कायम आहे. प्रश्न आता केवळ मुंबई गाठण्याचा नाही, तर प्रश्न आहे तो या आंदोलनाची पुढची दिशा काय?

'शरीरापेक्षा दौरा महत्त्वाचा नाही. दौरा रद्द करावा लागेल. माझ्या जागेवर कोणीही असू द्या, समाजासाठी एक बळी जाऊ द्या', असं मनोज जरांगे म्हणाले. जरांगेंच्या या शब्दांनी आंदोलनाचा संघर्ष किती टोकाला पोहोचला आहे, याची जाणीव होते.

त्यातच मुंबई पोलिसांनी गणेशोत्सव आणि कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. त्यावर जरांगे उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत आहेत. त्यातच जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत, आपल्याला गोळ्या घालण्याचा कट रचला जात असल्याचा दावा केला. या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, जरांगे मुंबईपर्यंत पोहोचतील? की प्रकृती त्यांना या लढ्यात अडवणार?

ही बातमी वाचा:

शिवानी पांढरे
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ट्रॉली बॅगच्या खास कप्प्यात गांजा लपवला, तरीही अधिकाऱ्यांनी शोधून काढला, पुणे विमानतळावर मोठी कारवाई, तब्बल 1 कोटी 14 लाख रुपयांचा गांजा जप्त 
ट्रॉली बॅगच्या खास कप्प्यात गांजा लपवला, तरीही अधिकाऱ्यांनी शोधून काढला, पुणे विमानतळावर मोठी कारवाई, तब्बल 1 कोटी 14 लाख रुपयांचा गांजा जप्त 
Pune Crime News: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले पुरुषाचे पिशवीत तोडून टाकलेले दोन पाय, सीम कार्डचा कव्हर अन् पोलिस पोहोचले ठेककेदारापर्यंत, शेवटी गूढ उकलले!
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले पुरुषाचे पिशवीत तोडून टाकलेले दोन पाय, सीम कार्डचा कव्हर अन् पोलिस पोहोचले ठेककेदारापर्यंत, शेवटी गूढ उकलले!
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Sunetra Pawar: पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Devendra Fadnavis: दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, अनेक दशक रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
Sonia Gandhi Journey of Love: माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण
माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
Embed widget