Mahindra New EV plant in Pune: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. महिंद्रा पुण्यात 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याला महाराष्ट्र शासनाकडून औद्योगिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मान्यताही मिळाली आहे. महिंद्रा पुण्यात (Pune) इलेक्ट्रिक वाहन उत्पादक प्लांट उभारणार आहे. या प्लांटच्या निर्मितीसाठी 7 ते 8 वर्षांचा कालावधी लागू शकतो. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार आहे.
महिंद्राच्या आगामी एसयूव्हीचे मुख्य डिझायनर प्रताप बोस यांच्या नेतृत्वाखाली ऑक्सफर्डशायर, युनायटेड किंगडम येथील महिंद्रा अॅडव्हान्स्ड डिझाइन युरोप (MADE) सुविधेमध्ये एसयूव्हीची डिझाइन तयार करण्यात आली आहे. यावर बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा ऑटो आणि फार्म सेक्टर कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर म्हणाले की, “पुण्यात (Pune) गुंतवणूक करण्यासाठी आणि आमच्या ईव्ही उत्पादन प्रकल्पाची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या या मंजुरीमुळे आम्हाला आनंद झाला आहे. महाराष्ट्र 70 हुन अधिक वर्षांपासून आमचे गृहराज्य आहे. महिंद्राच्या गुंतवणुकीसोबतच सरकार व्यवसाय सुलभता आणि प्रगतीशील धोरणांकडे लक्ष देत आहे. यामुळे महाराष्ट्राला भारताचे ईव्ही हब बनण्यास मदत होईल, ज्यामुळे पुढील भारतीय आणि परदेशी गुंतवणुकीला थेट प्रोत्साहन मिळेल.
दरम्यान, कंपनीच्या कॉन्सेप्ट मॉडेल XUV.e8 मध्ये एक लोखंडी ग्रील, बंपर माउंट केलेले हेडलॅम्प, बम्परकडे जाणारा पूर्ण रुंदीचा LED लाइट बार, एक शार्प डिझाइन केलेला हुड आणि Angular Stance आहे. XUV.e8 ची लांबी 4740mm, रुंदी 1900mm आणि उंची 1760mm आहे, व्हीलबेस 2762mm आहे. XUV700 च्या तुलनेत इलेक्ट्रिक SUV सुमारे 45mm लांब, 10mm रुंद आणि 5mm उंच आहे. ही कार 80kWh बॅटरी पॅक आणि AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) प्रणालीसह उपलब्ध केले जाईल.
इतर बातम्या:
Car loan Information:
Calculate Car Loan EMI