पुणे : पुणेकरांसाठी (Pune) अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गुरुवार 21 डिसेंबर रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा (Water Supply) बंद राहणार आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, लष्कर जलकेंद्र, नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र, वारजे, एसएनडीटी, चतु:श्रृंगी, वडगांव जलकेंद्र, अशा अनेक ठिकाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार ठिकाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेकडून घेण्यात आलाय. 


तसेच पुण्यात शुक्रवार सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेकडून जाहीर नोटीस देखील काढण्यात आलीये. पुण्यातील मध्यवर्ती भाग तसेच पेठांमध्ये गुरुवारी पाणी येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलंय. 


'या' भागात बंद राहणार पाणीपुरवठा


हा पाणीपुरवठा पुणे शहरातच बंद ठेवण्यात येणार आहे.  शहरातील सर्व पेठा, क्वार्टरगेट परिसर, गंजपेठ, गुरुवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर, स्वारगेट, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर 1 आणि 2, लेक टाऊन परिसर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गावठाण, डायस प्लाॅट, ढोले मळा परिसर, सॅलेसबरी पार्क, गिरीधर भवन चौक परिसर, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज, धनकवडी परिसर, हडपसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळे पडळ, बीटी कवडे रस्ता, भीमनगर, रामटेकडी, औद्योगिक परिसर, वानवडी, पुणे कॅन्टोन्मेंट परिसर, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरूळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, खराडी, वडगांवशेरी, ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, मालधक्का, येरवडा, रेसकोर्स, मुळा रस्ता, खडकी, हरीगंगा सोसायटी, लोहगांव, विमाननगर, वडगांवशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी, पाषाण, भूगाव रस्ता, बावधन, उजवी आणि डावी भुसारी काॅलनी, गुरूगणेशनगर, चिंतामणी सोसायटी, पूजा पार्क, सारथी शिल्प सोसायटी, डुक्कर खिंड परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहिल. 


पुण्यात पाण्याचा तुडवडा


यंदाच्या वर्षात मुबलक पाऊस न झाल्याने पुणेकरांवर पाणी संकट कोसळलं आहे. त्यामुळे पुण्यातील धरणं ही 100 टक्के भरली नाहीत. म्हणूनच उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. तसेच या पाण्याचे वापर देखील योग्य प्रमाणात करावा लागणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा अन्यथा जानेवारीपासून पाणीकपात करण्याचा इशारा महापालिकेकडून जलसंपदा विभागाला देण्यात आला होता. 


हेही वाचा : 


Pune Woman Molestation Case : पुण्यात 70 वर्षीय वृद्धाचा कारनामा, कामाच्या ठिकाणी महिलेला जवळ ओढून जबरदस्तीने चुंबन