Pune News : यंदाचा पठ्ठे बापूराव पुरस्कार ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत मालती इनामदार यांना जाहीर, शरद पवारांच्या हस्ते होणार सन्मान
Pune News : यंदाचा पठ्ठे बापूराव पुरस्कार हा ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत मालती इनामदार यांना जाहीर करण्यात झाला असून शरद पवारांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पुणे : यावर्षीचा 'पठ्ठे बापूराव पुरस्कार' (Patthe Bapurao Award) ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत मालती इनामदार यांना जाहीर करण्यात आलाय. येत्या 30 नोव्हेंबरला शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आलाय. मालती इनामदार यांच्याबरोबर शोभा इस्लामपूरकर, कृष्णा मुसळे आणि वैशाली वाफळेकर या लोककलावंतांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
लोककलांसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना शाहीर पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो . यंदा या पुरस्काराचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.
प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे यंदाचे पुरस्कार
शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार जेष्ठ लोकनाट्य कलावंत मालती इनामदार यांना जाहीर करण्यात आला आहे.
लोकसाहित्यिक 'डॉ. भास्करराव खांडगे' पुरस्कार लावणी गायिका आणि नृत्यांगणा शोभा इस्लामपुरकर यांना जाहीर झालाय.
पवळा पुरस्कार लावणी नृत्यांगणा आणि गायिका वैशाली वाफळेकर यांना जाहीर करण्यात आलाय.
शाहीर 'बापुसाहेब जिंतीकर पुरस्कार' प्रसिद्ध ढोलकी वादक कृष्ण मुसळे यांना जाहीर झालाय.
पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान हे सन 1998 पासून दरवर्षी 'शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार' देते. आतापर्यंत अनेक दिग्गज नृत्यांगणा या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. यामध्ये दिदराबाई गुळखंडकर, आशा काळे, शकुंतला नगरकर आणि छाया खुटेगाबकर यांचा समावेश आहे. दरम्यान पुणे महानगरपालिकाही 1995 पासून दरवर्षी 'लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार देते.
हेही वाचा :