पुणे : मगील वर्षीच्या तुलनेत सूर्यफूल पाम, सोयाबीन तेलाची (Oil) आवक नियमित सुरू आहे. त्याचप्रमाणे खाद्यतेलाची (Food Oil) आयात देखील वाढलेली आहे. इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थिती, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला मागणी कमी झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट झाली. याचा सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचं चित्र आहे. त्यामुळे यंदाची सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार यात शंका नाही.
सध्या सुरु असलेल्या महागाईमुळे सर्वसामन्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत असल्याचं चित्र आहे. त्यातच खाद्यतेलांचे दर कमी झाल्यामुळे सामान्य नागरिकांना आणि गृहिणींना देखील कीहीसा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतयं.
व्यवसायिक स्वयंपाकाच्या गॅसच्या खाद्यतेलांचे 15 किलोचे दर
तेल | यंदाचे दर | मागील वर्षीचे दर |
पाम | 1350 ते 1500 रुपये | 2100 ते 2150 रुपये |
सूर्यफूल | 1400 ते 1500 रुपये | 2300 ते 2400 रुपये |
सोयाबीन | 1400 ते 1500 रुपये | 2300 ते 2400 रुपये |
सरकी | 1400 ते 1500 रुपये | 2200 रुपये |
वनस्पती तूप | 1400 ते 1500 रुपये | 1900 ते 2000 रुपये |
शेंगदाणा | 2700 ते 2800 रुपये | 2800 ते 2900 रुपये |
नुकतीच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 100 रुपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे गृहिणींचं बजेट पुन्हा एकदा कोलमोडलं होतं. पण आता खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये घट झाल्यानंतर काहीसा दिलासा गृहिणींना मिळाला आहे.
दर कमी होण्याचं कारण काय?
मागील वर्षी खाद्यतेलांचे दर हे अधिक प्रमाणात होते. पण यंदा हे दर 30 ते 35 टक्क्यांना कमी झाल्याचं चित्र आहे. परंतु शेंगदाणा तेलाचे दर जैस थेच राहिलेत. यंदा परदेशातून येणाऱ्या सूर्यफूल, पाम, सोयाबीन तेलाची आवाक ही नियमितपणे सुरु असल्याचं मुख्य कारण आहे. त्यातच खाद्यतेलाची आवाक देखील यंदाच्या वर्षात वाढल्याचं चित्र आहे. इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थिती हे एक मुख्य कारण खाद्यतेलाच्या किंमतींचे दर कमी होण्यामागे दुसरं मुख्य कारण आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला मागणी देखील कमी झालीये. त्यामुळे काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात घट झाली.
हल्ली बरेच जण फराळ हा घरी करत नाहीत. त्यामुळे बाहेरुन फराळ विकत घ्यायचा झालं तर त्यासाठी बरेच पैसे मोजावे लागतात. पण खाद्यतेलांचे दर कमी झाल्याने या फराळाच्या दरातही घट होण्याची शक्यता आहे. यामुळे देखील गृहिणांना दिलासा मिळाला असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर नक्की कसा परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हेही वाचा :
Diwali 2023: दिवाळीत झाडू का खरेदी केला जातो? जाणून घ्या धनत्रयोदशीला झाडूच्या पूजेचं विशेष महत्त्व