पुणे : प्रसिद्ध गायक सिद्धु मुसेवाला (sidhu moosewala) याच्या (Pune Crime News) हत्या प्रकरणातील शार्प शुटर संतोष जाधव याच्या नावाने पुण्यातील एका व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. संतोष जाधन नावाने फोन करुन त्याने व्यावसायिकाला फोन करुन तुम्हाला मारण्यासाठी 15 लाखांची सुपारी दिल्याचं सांगितलं आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला आहे.
हा प्रकार लक्षात येताच कोथरुड परिसरातील 34 वर्षीय व्यावसायिकाने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला प्रकार सांगून तक्रार दिली आहे. पुण्यातील कोथरुडचे हे व्यावसायिक मागील काही दिवसांपासून आजारी आहे. त्यामुळे ते घरातच असतात. घरी असताना त्यांना फोन करुन धमकी दिल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. तक्रारीनुसार, या तरुणाने फोन केला आणि सिद्धु मुसेवाला कांड ऐकला आहे का, मी संतोष जाधव बोलत आहे. तुझ्या नावाची 15 लाखांची सुपारी मिळाली आहे. तुझा जीव हवा असेल तर तू किती देतोस बोल. पैसे नाही दिले तर गोळ्या घालेन, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. तुझ्या घरच्यांना बायका पोरांना मारेन, तुला दिवाळी साजरी करायची असेल तर आता 50 हजार दे असे म्हणून पुन्हा धमकावले.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शार्प शूटर संतोष जाधव व त्याच्या साथीदाराला सुपारी देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला गुजरातमधून अटक करुन त्याच्यावर मकोका कारवाई करण्यात आली होती.
अनिल भोसलेंच्या पत्नीकडे मागितली खंडणी...
राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले (Pune NCP MLA Anil Bhosale) यांना ईडीच्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी 15 कोटींची मागणी करणारा एक बनावट कॉल (Fake Call) आल्याची माहिती समोर येत होती. आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला बनावट ईडी अधिकाऱ्याचा (Fake ED Officer) फोन आला आणि त्याने ही मागणी केली होती. अनिल भोसले यांना शिवाजीराव भोसले बँक घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली होती. अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांना एक कॉल आला आणि समोरच्या व्यक्तीने आपण ईडीचा अधिकारी असल्याची बतावणी केली होती. अनिल भोसले यांना तुरुंगातून सोडवायचं असेल तर 15 कोटींची मागणी त्याने केली. त्यानंतर भोसले यांच्या पत्नीने तातडीने तक्रार केली.
इतर महत्वाची बातमी-