एक्स्प्लोर

Pune Health Clinic: पुण्यात ट्रान्सजेंडर लोकांसाठी समर्पित आरोग्य क्लिनिक सुरू

पुणे शहरात ट्रान्सजेंडर लोकांसाठी समर्पित आरोग्य क्लिनिक सुरू झाले आहे.

पुणे : ट्रान्सजेंडर लोकांसोबत समाजात नेहमीच भेदभाव होताना पाहायला मिळतो. अगदी रूग्णालयातही त्यांना वेगळी वागणूक दिल्याचे अनुभव आहेत. यामुळेच पुणे शहरात पूर्णपणे ट्रान्सजेंडर लोकांसाठी एक क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ट्रान्सजेंडर्सना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि प्रयोगशाळेच्या चाचण्यांची मोफत सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

'एक्सेलेरेट' नावाच्या पुण्यातील क्लिनिकमध्ये ट्रान्सजेंडर समाजातील लोकांना मोफत आरोग्य सेवा दिली जाणार आहे. या क्लिनिकचे जिल्हा समन्वयक दीपक निकम यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, की "सेवांमध्ये व्यक्तींचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी समुपदेशन सत्रांचा समावेश असेल. तसेच किरकोळ आजारांचे निदान करण्यासाठी प्रयोगशाळेच्या चाचण्या करण्याची सुविधा आहेत. आम्हाला आशा आहे की हे केंद्र लवकरच सुरू होईल." "

निकम पुढे म्हणाले, की "या समुदायावर संशोधन केल्यानंतर आमच्या टीमच्या लक्षात आले की आम्ही ट्रान्सजेंडर लोकांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र सुरू केले पाहिजे. या पुढाकाराने आम्ही त्यांना अपेक्षित आरोग्यसेवा पुरवू शकू अशी आशा आहे."

यावेळी ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या सोनाली दळवी म्हणाल्या, की "सामान्य रूग्णालयात उपचार घेताना स्थानिक लोकांकडून आमच्यासोबत खूप भेदभाव केला जातो. बर्‍याच महिलांना आमची उपस्थित खटकते. म्हणूनच आम्ही आशा करतो की या क्लिनिकद्वारे आम्ही ट्रान्सजेंडर लोकं आमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो. "

पुण्यात दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार असल्याने ट्रान्सजेंडर लोकांसाठी आता आशेचा किरण उदयास आला आहे.

16 सप्टेंबर 2020 रोजी अधिकृत प्रसिद्धीनुसार सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने "ट्रान्सजेंडर पर्सन्स (हक्कांचे संरक्षण), अधिनियम, 2019" कायदा केला आहे. नॅशनल काऊन्सिल ऑफ ट्रान्सजेंडर पर्सन्स मधील कायद्याच्या VII व्या अध्यायानुसार, इतर सदस्यांसह, रोटेशनद्वारे राज्य/केंद्रशासित प्रदेशातील ट्रान्सजेंडर समुदायाचे पाच प्रतिनिधी आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करणार्‍या अशासकीय संस्था किंवा संघटनांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाच तज्ञ केंद्र सरकारने नामनिर्देशित केले पाहिजे. परिषद विविध धोरणांच्या प्रभावाचे मूल्यांकन करेल आणि ते निर्णय घेण्यास मोकळे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल
पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल
FDA Action On Siya Goyal Father Shop Pune Market: सिया गोयलच्या वडिलांच्या अडचणीत वाढ, विनापरवाना दुकान सील; आता भेसळ सिद्ध झाल्यास होणार मोठी कारवाई
सिया गोयलच्या वडिलांच्या अडचणीत वाढ, विनापरवाना दुकान सील; आता भेसळ सिद्ध झाल्यास होणार मोठी कारवाई
Ravindra Dhangekar Khalil Shaikh Pune News: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी जीवन संपवलं; टोकाचं पाऊल उचलण्याआधी काय काय म्हणाले?
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी जीवन संपवलं; टोकाचं पाऊल उचलण्याआधी काय म्हणाले?
Jejuri Warkari Accident Deaths : जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला; उपचारादरम्यान आणखी एका महिलेची प्राणज्योत मालवली
जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला; उपचारादरम्यान आणखी एका महिलेची प्राणज्योत मालवली

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
Koel Mallick: तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
Embed widget