एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यातील बेपत्ता मगर-सातव कुटुंबं अखेर सापडली
पुण्यातील हडपसर भागात राहणारे मगर आणि सातव कुटुंबातील सात जण संपर्काबाहेर होते, मात्र हवेली तालुक्यात त्यांचा थांगपत्ता लागला
पुणे : पुण्यातून बेपत्ता झालेल्या दोन्ही कुटुंबांशी अखेर संपर्क झाला. पानशेतला फिरायला गेलेले मगर आणि सातव कुटुंबातील सात जण एकाएकी संपर्काबाहेर गेल्याने कुटुंबीय काळजीत पडले होते. मात्र पुण्याच्या हवेली तालुक्यातच आज दोन्ही कुटुंबं सापडली.
सिद्धार्थ उर्फ हरीश मगर आणि जगन्नाथ हरी सातव हे दोघं आपल्या कुटुंबासह पानशेतला फिरायला गेले होते. सिद्धार्थ मगर यांच्या पत्नीचं बहिणीशी फोनवरुन काल दुपारी 11 वाजता बोलणं झालं होतं.
तेव्हापासून या दोन्ही कुटुंबांकडे असलेले पाच मोबाईल नंबर बंद येत होते, त्यामुळे कुटुंबीय काळजीत पडले होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत शोधाशोध झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
पानशेतमधील गुंजन रिसॉर्टमध्ये सातव आणि मगर कुटुंब मुक्कामाला होती. अतिपावसामुळे कोणाच्याच मोबाईल रेंज नव्हती. 'एबीपी माझा'ची बातमी रिसॉर्टमध्ये पाहिल्यावर त्यांनी रिसॉर्टमधील लँडलाईनवरुन संपर्क साधला. दोन्ही कुटुंबं आता पुण्याकडे यायला निघाली आहेत.
पुण्याच्या हडपसर भागात राहणाऱ्या दोन्ही कुटुंबप्रमुखांचा जमिन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे.
मगर आणि सातव कुटुंबीय
सिद्धार्थ उर्फ हरीश सदाशिव मगर (38 वर्षे)
स्नेहल उर्फ ईश्वरी मगर
जुळ्या मुली – आरंभी आणि साईली (5 वर्षे)
बेपत्ता मगर कुटुंब
जगन्नाथ हरी सातव
पत्नी आणि त्यांचा पाच वर्षाचा मुलगा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement