एक्स्प्लोर

Pune Crime News : पुण्यात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 1 कोटींचा दारुसाठा जप्त; दोघांना अटक

राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणे  या पथकाने गोवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या मद्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने तब्बल 1 कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.

Pune Crime News :  राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणे(Pune Crime news) या पथकाने गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्यावर धडक कारवाई केली. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने तब्बल 1 कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.  पुण्याजवळील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ ही करावाई करण्यात आली. काल रात्री ही कारवाई करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग, पुणे यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक चरणसिंग राजपूत व उपअधीक्षक संजय आर. पाटील, युवराज शिंदे व एस. बी. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आली. पथकाला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनंतर पथकाने 1 जानेवारी 2024 रोजी खेड शिवापूर टोलनाक्यावर वाहन तपासणी सुरू केली. त्यांचे लक्ष दहाचाकी कंटेनरकडे वेधण्यात आलं. तपासणीदरम्यान संशय आल्याने कसून शोध घेण्यात आला. चौकशी केली असता चालकाच्या प्रतिसादामुळे संशय निर्माण झाला आणि पथकाने सविस्तर तपासणी केली. गाडीच्या पुढील बाजूस ठेवण्यात आलेल्या पेंट कॅनमध्ये एक हजारांहून अधिक लपवलेले दारूच्या बाटल्या आढळून आल्याचं पोलिसांनी संगितलं आहे. 

जप्त करण्यात आलेली दारू गाडीच्या किमतीसह तब्बल एक कोटी रुपये किमतीची असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे चालकाकडे आवश्यक वाहतूक पास, परवाना किंवा मद्याच्या कायदेशीर वाहतुकीशी संबंधित कोणतीही संबंधित कागदपत्रे नव्हती. तस्करीप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे.

 डिसेंबरमध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त 
 
 राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुणे जिल्ह्यात नवीन वर्ष आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात 223 गुन्हे दाखल करत 35 वाहने जप्त करत 1 कोटी रुपयेपेक्षा जास्त मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यात आलाय. काल गोवा राज्यातून आलेला माल पुण्याच्या बिबवेवाडी मधून जप्त करण्यात आला आहे. यामध्ये तीन आरोपींना अटक केली. यामध्ये 1250 बॉटल ज्याची किंमत 5 लाख आहे ते जप्त केल्या आहेत, यामध्ये दोन फरारी आरोपींचा तपास सुरू आहे. त्याच बरोबर नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष पथक 17 पथक 50 अधिकारी 150  कर्मचारी शहर जिल्ह्यात कार्यरत आहेत. संशय वाहन नागरीक यांच्यावर नजर ठेवणार आहेत.

जानेवारीत अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिस विभागाच्या पथकांचे लक्ष असणार आहे. अवैध दारू विकणाऱ्या वर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची करडी नजर असणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे  दिली आहे.

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : पुण्यात एका मद्यधुंद तरुणीचा राडा; महिला पोलिसाला मारहाण

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'
तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Embed widget