पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि महायुतीचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना निवडणूक अधिकाऱ्याकडून नोटीस बजावण्यात आली आहे. महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजी आढळराव पाटील आणि महाआघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहेत. उमेदवारांच्या प्रचाराच्या खर्चाच्या पहिल्या तपासणीमध्ये तफावत आल्यांने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्याच्यासोबतच पुण्यातील तीन आणि शिरुरमधील सहा अपक्ष उमेदवारांनादेखील नोटीस बजावली आहे. 


लोकसभा उमेदवारांच्या खर्चाची माहिती ठेवली जाते आणि खर्चाची तपासणीदेखील केली जाते. त्यात सगळ्या उमेदवारांची तपासणी केली जाते या तपसणीदरम्यान त्यांच्या प्रचार खर्चात मोठी तफावत जाणवली.  उमेदवारांकडे असलेल्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवहीत आणि निवडणूक विभागाकडे असलेल्या नोंदवहीतून हे सगळं समोर आलं. त्यानंतर या सगळ्या उमेदवारांना थेट नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. 


 धंगेकर आणि मोहोळांना खर्च मावण्यात आला होता. त्यावेळी मोहोळांनी  33 लाख 13 हजार 402 रुपयांचा खर्च दाखवला आहे. त्यात  27 लाख 24 हजार 232 रुपयांचा खर्चाचा हिशेब जुळत नसल्याचं समोर आलं. त्यानंतर धंगेकरांचं तर खर्च जुळत नाही त्यामुळे ठोस आकडेवारी मिळाली नाही, असं पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 


त्यासोबतच आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्या खर्चातदेखील मोठी तफावत समोर आली आहे. अमोल कोल्हे यांनी 15 लाख 67 हजार 368 रुपये खर्च दाखवला आणि निवडणूक विभागाच्या नोंदवहीत 43 लाख 90 हजार 81 रुपये खर्च झाल्याचं दिसून येत आहेय त्यामुळे साधारण 13 लाख रुपयांचा हिशोब जुळत नाही आहे. त्यासोबतच त्यांच्याविरोधात उभे ठाकलेले आढळराव पाटील यांनी 19 लाख 62 हजार 160 रुपये खर्च दाखवला मात्र नोंदवहीत 43 लाख 90 हजार  81 रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. त्यामुळे त्यांच्या हिशेबातदेखील तफावद दिसून आली आहे.


याशिवाय अपक्ष उमेदवार वसंत चांदगुडे, रोहिदास भोर, हरिदास भिसे, अमर बोऱ्हाडे, अमोल पाचुंदकर आणि उमेश म्हेत्रे हे सहा उमेदवार अनुपस्थित राहिल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी ४८ तासांच्या आत हिशेब सादर करण्याबाबत नोटीस पाठवली आहे.


इतर महत्वाची बातमी-


Raj Thackeray: सत्तेसाठी या थराला जाऊन स्वाभिमान गहाण टाकणं माझ्याने शक्य नाही; धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढण्याच्या ऑफरला राज ठाकरेंचं उत्तर


Rahul Gandhi on Electoral Bonds : राजकारण साफ करत होता, तर निवडणूक रोख्यातील देणगीदारांची नावं का लपवली? राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल