पुणे : पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या (Maharashtra News) परिसरात मागील काही महिन्यांपासून बिबट्यांचा   (Leopard Attack ) वावर चांगलाच वाढला आहे. या बिबट्यांमुळे अनेक परिसरात दहशतीचं (Pune Leopard Attack) वातावरण निर्माण झालं आहे. बिबट्याने मानवी वसाहतीत प्रवेश करणं हे काही नवीन बाब राहिली नाही. मंगळवारच्या रात्री मात्र बिबट्याने थेट पुण्यातील रुग्णालयातच (Hospital) प्रवेश केला आणि चांगलीच खळबळ उडाली. सुदैवाने वेळ रात्री साडे दहाची होती आणि रुग्णाच्या वॉर्डचं दार बंद होतं. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली. 


जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात बिबट्याने प्रवेश केला होता. भक्षाच्या शोधात हा बिबट्या खाजगी रुग्णालयाच्या इमारतीत पोहचला होता. तातडीनं वनविभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. पथकाने सापळा रचला पण त्याचवेळी वनरक्षक कैलास भालेराव यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. यात त्यांच्या हाताला मोठी इजा झाली. त्यानंतर काहीवेळाने बिबट्याने इमारतीतून लगतच्या पत्र्यावर झेप घेतली आणि तिथून शेजारच्या जंगलात पळ काढला. हा थरार पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. जखमी वनरक्षकावर उपचार सुरू आहेत.


वनरक्षक कैलास भालेराव यांच्यावर बिबट्याचा हल्ला (Pune Leopard Attack) 


बिबट्याला जेरबंद करणं थरारक होतं. त्यामुळे बिबट्या सळो की पळो करत होता. यातच वनरक्षक कैलास भालेराव बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या पथकानेदेखील सडेतोड प्रयत्न केले. तरीही बिबट्या हाताशी लागत नव्हता. तेवढ्यात वनरक्षक कैलास भालेराव याच्यावर बिबट्याने हल्ला केला. हे पाहून सगळे वनरक्षक घाबरले. या हल्ल्यात कैलासच्या हाताला मोठी जखम झाली. त्याच्या हाताला टाकेदेखील पडले आहेत. 


बघ्यांची मोठी गर्दी 



हा सगळा प्रकार कळताच पुण्यातील रुग्णालयाजवळ हा थरार पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या गोंधळामुळे बिबट्या जेरबंद करण्यास अडचणी निर्माण झाल्या. मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहेत. पाण्याच्या शोधात हे बिबटे वस्तीत शिरत असावेत असा अंदाज आहे. मात्र या बिबट्यांच्या अशा वावरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.


इतर महत्वाची बातमी-


-Maval Loksabha Constituency : मावळमध्ये ठाकरे गटाचा दावेदार ठरला! महायुतीविरोधात संजोग वाघेरे मैदानात


-Shiv Sena UBT Canditates: शिवसेना ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?