पुणे : मेफेड्रोन ड्रगतस्करीचे आंतराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्त (Pune Police) केल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हेशाखेने (Pune Crime Branch) आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पुणे शहरात केमिकल ताड़ी तयार करण्यासाठी लागणारे केमिकल पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक कारखाना उद्धवस्त केला आहे. तेथून तब्बल दोन हजार तीनशे किलो (2300 KG) क्लोरल हायड्रेट पावडर (Chemical) जप्त करण्यात आली आहे . त्याची किंमत 60 लाख रुपयांच्या घरात आहे. तसेच तेथून केमिकल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. सर्वात गंभीर म्हणजे सातवी पास व्यक्ती हा कारखाना चालवत होता.
दोघांना बेड्या
पुण्यात बनावट ताडी तयार करण्यासाठी लागणारे केमिकल विक्री होत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पुणे पोलिसांनी धडक कारवाई करण्याचं ठरवलं आणि थेट कारवाई केली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. निलेश विलास बांगर (वय 40, रा- पिंपळगाव खडकी, कुरकुटे मळा, मंचर ता आंबेगाव), प्रल्हाद रंगनाथ भंडारी (वय 60, रा केशवनगर, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
केमिकलचे 142 किलो 750 ग्रॅम वजनाचे 5 पोते जप्त
क्लोरल हायड्रेड हे विषापी बनावट ताडी बनवण्यासाठी वापरलं जातं. मुंढव्यतील आरोपी असलेल्या प्रल्हाद रंगनाथ भंडारी याच्याकडे क्लोरल हायड्रेड साठा पुणे पोलिसांना सापडला. याच प्रकरणाची सखोल चौकशी केली असता. नीलेश बांगरने याने हा माल पुरवल्याचं समोर आलं. त्यानंतर पुणे पोलिसांनी थेट घरावर छापा टाकत आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खंडकीतून केमिकलचे 142 किलो 750 ग्रॅम वजनाचे 5 पोते असा 2 लाख 95 हजार रुपयांचा माल जप्त केला.
पुणे क्राईम ब्रांचने वेल्हाळे गाठलं अन्...
पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या खोलात जाऊन पर्दापाश करण्याता निर्णय घेतला आणि त्यात थेट केमिकल विषारी ताडी तयार करणेसाठी वापरले जाणारे क्लोरल हायड्रेड रसायन पावडर तयार करण्याचा अवैध कारखाना सुरु केल्याचं समोर आलं. अहमदनगर जिल्ह्यातील सांगमनेर येथील वेल्हाळे येथे बांगरने हा कारखाना सुरु केला असल्याचं पोलीस तपासात उघड झालं. पुणे क्राईम ब्रांचने वेल्हाळे गाठलं आणि छापा टाकला. यात 2,217 किलो तयार क्लोरल हायड्रेड आणि क्लोरल हायड्रेड तयार करण्यासाठी लागणारे सगळे उपकरणं असा एकूण 60 लाख रुपयांचा माल जप्त केला आणि कारखानादेखील सिल केला आहे.
इतर महत्वाची बातमी-