Chandrakant patil : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी सामाजिक विषयात तरी 'नरो वा कुंजरो वा' अशी भूमिका घेऊ नये, अशी टीका पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी शरद पवारांवर केली आहे. त्यांचं वय आणि अनुभव मोठा तुम्ही एखादा विषय मांडला की कोण आक्षेप घेणार नाही त्यामुळे त्यांनी योग्य भूमिका मांडायला हवी, असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे. 


मी शरद पवारांना आदेश देऊ शकत नाही.
शरद पवारांनी सामाजिक विषयात बोलताना योग्य भूमिका घ्यावी. सगळे बरोबरच आहे अशी भूमिका ते घेत असतात.  ते वयाने आणि अनुभवाने फार मोठे आहेत . त्यामुळे त्यांना मी आदेश देऊ शकत नाही. त्यात ते माझ्या पक्षाचेदेखील नाहीत. धर्मरक्षकावरुन वाद निर्माण झाला आहे. मात्र धर्म म्हणजे पुजा वगरे नसून ती देशातली जीवनशैली आहे. या जीवनशैलीत सर्वधर्मसमभाव आहेच. त्यामुळे या देशातल्या राजाने कोणावर आक्रमणं केली नाहीत. दुसऱ्याच्या जागेवर हक्कही सांगितला नाही. त्याउलट उपासना करण्यासाठी जागा दिल्या. त्याचा आदर केला. त्यामुळे हिंदू या शब्दातच सर्वधर्म समभाव आहे. इतरांच्या धर्माला चुकीच आणि स्वत:च्या धर्माला चांगलं म्हणणं हे तुमच्या कल्पनेत असेल. माझा धर्म श्रेष्ठ आहे मात्र तो इतरांच्या धर्माला श्रेष्ठ मानतो, असंही ते म्हणाले. उर्फी जावेद प्रकरणावर माझं काहीही मत नाही. आमच्या नेत्या चित्रा वाघ यासंदर्भात बोलतील असंही ते म्हणाले.


प्रत्येक पोलीस ठाण्यात  बालस्नेही कक्ष उभारणार
पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्ष स्थापन करण्यात आली असून उर्वरित पोलीस ठाण्यात लवकरच अशा प्रकारच्या कक्षाची स्थापना करण्यात येईल; त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते स्वारगेट पोलीस ठाण्यातील बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्षाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कायद्यानुसार सर्वच पोलीस ठाण्यामध्ये बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्षाची सुरुवात होणार आहे. लहान बालके व महिलांवर अन्याय व अत्याचार झाल्यास ते पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना पोलीसांची भिती वाटू नये, त्या ठिकाणी विश्वास वाटावा, दडपण येऊ नये यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. 


आणखी वाचा:
Pune Crime news: स्पिकर बंद केल्याच्या रागातून पोलिसांना धक्काबुक्की; पाच जणांना अटक